Surya Grahan 2025: वर्षातील दुसरे सूर्यग्रहण या दिवशी होणार, तारीख वेळ आणि सुतक काळ जाणून घ्या
Surya Grahan 2025: या वर्षातील पहिले सूर्यग्रहण शनिवार (दि.29) मार्च संपलं आहे. हे सुर्यग्रहण भारतात दिसलं नाही. आता लोकांना उत्सुकता आहे की पुढे कोणते ग्रहण आहे, ते कधी लागणार आहे. तसेच ते भारतात दिसेल की नाही, यावर चर्चा सुरु आहे. तर चला मग सविस्तर जाणून घेऊया.
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10:59 वाजता सुरू होईल. या दिवशी अश्विन अमावस्या असेल. हे देखील आंशिक सूर्यग्रहण असेल. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3:23 वाजता त्याचा समारोप होणार आहे.

सूर्यग्रहण कुठे दिसणार?
21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराच्या काही भागातून दिसेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा येथे कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे सुतक काळचा नियम लागू होणार नाही.
वर्षातील पहिले चंद्र आणि सूर्यग्रहण मार्चमध्ये झाले
यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी, होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी झाले. हे ग्रहण सिंह राशी आणि उत्तरा फागुनी नक्षत्रात झाले. भारत वगळता, हे ग्रहण ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांमध्ये, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक महासागर, पूर्व आशिया आणि अंटार्क्टिकाच्या बहुतेक भागात दिसले होते.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च 2025 रोजी चैत्र अमावस्येच्या दिवशी झाले. ते मीन राशी आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होते. भारत वगळता युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर या भागातही ते दृश्यमान होते.
सूर्यग्रहण म्हणजे काय?
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडू लागते, तेव्हा सूर्यग्रहण होते. जिथे ही सावली पडते तिथे एकतर सूर्य दिसत नाही किंवा सूर्याचा मोठा भाग काळा दिसतो. या खगोलीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.
सूर्यग्रहणाची धार्मिक श्रद्धा
पुराणानुसार, पहिले पूर्ण सूर्यग्रहण समुद्रमंथनाच्या वेळी झाले होते. रामायणातील अरण्य कांडातही सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे. असे म्हटले जाते की त्या दिवशी भगवान रामाने खर-दुषणाचा वध केला. महाभारत काळात, ज्या दिवशी पांडव जुगारात हरले, त्या दिवशीही सूर्यग्रहण होते. महाभारत युद्धाच्या 14 व्या दिवशी, जेव्हा अर्जुनाने जयद्रथाचा वध केला, तेव्हा सूर्यग्रहण झाले. जेव्हा कृष्णाची द्वारका नगरी पाण्याखाली गेली होती, तेव्हाही सूर्यग्रहण लागले होते.












Click it and Unblock the Notifications