ना प्रजासत्ताक दिनाला, ना महाकुंभाला, ना पक्षाच्या कार्यक्रमांना... राहुल गांधी आहेत कोठे?

भारताने नुकताच ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. याशिवाय देशात दिल्लीपासून फक्त काही किलोमिटर अंतरावर अणाऱ्या प्रयागराजमध्ये महाकुंभही सुरु आहे. तसेच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा लोकशाहीचा उत्सवही सुरु आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात देशातील आणि राज्यातील सर्व नेते उत्सव साजरा करताना दिसले. अनेक बड्या नेत्यांनी एकतर प्रयागराजमध्ये कुंभस्नान केले किंवा जाणार आहेत, तर दिल्लीतील नेते निवडणुकीच्या मैदानात घाम गाळत आहेत. मात्र या सगळ्यात काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Rahul Gandhi

महाकुंभापासून दूरावा

भारत हा सांस्कृतिक विविधता, परंपरा आणि लोकशाही मूल्यांनी ओळखला जाणारा देश आहे. पण, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मूल्यांपासून स्वत:ला वारंवार दूर ठेवल्याचे दिसले आहे. भारताच्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक असलेला महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमात सहभागी होऊन भाजपच्या नेत्यांनी जागतिक स्तरावर त्याचे महत्त्व तर वाढवलेच पण भारतीय संस्कृतीचा आदरही केला.

याउलट, राहुल गांधींनी या कार्यक्रमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, जे स्वतःला "जनेउधारी ब्राह्मण" म्हणून ओळखणारे राहुल गांधी यांनी स्वतःला गणेश चतुर्थी आणि नवरात्रीसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांपासून दूर ठेवलेले दिसले आहे. यावरून त्यांचे भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिक वारशाबद्दलचे अज्ञान उघड होते.

प्रजासत्ताकदिनालाही गैरहजर

प्रजासत्ताक दिनाची परेड ही भारताच्या लोकशाहीचे आणि सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. मात्र यंदा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी परेडला उपस्थित राहणे टाळले. ही अनुपस्थिती देशाच्या लोकशाही मूल्यांचा आणि सैनिकांच्या सन्मानाचा अपमान मानला जात होती, असे बोलले जात आहे.

पूर संकटात होते सुट्टीवर

जेव्हा भारतातील अनेक राज्ये पूरग्रस्त होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त भागाला भेट देत सैनिक आणि पीडितांना भेटत होते, तेव्हा राहुल गांधी परदेशी सुट्टीचा आनंद घेत होते. अशा वेळी त्यांची अनुपस्थिती त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर आणि राष्ट्रीय जबाबदारीवर प्रश्न निर्माण करते.

संविधान दिनी अनुपस्थिती

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी स्वतःला संविधानाचे रक्षक म्हणवून घेत संविधानाची प्रत घेऊन सभागृहात गर्जना करत होते. 2022 मध्ये संविधान दिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधींची अनुपस्थिती आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूला अभिवादन न करणे हे संविधान आणि घटनात्मक मूल्यांप्रती त्यांची उदासीनता दर्शवते.

राम मंदिर भूमीपूजनाला अनुपस्थिती

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन हे भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक मैलाचा दगड होता. या ऐतिहासिक प्रसंगी त्यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसच्या विचारसरणीवर आणि भारतीय संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इतकंच नाही तर गेल्या वर्षी २३ जानेवारीला अयोध्येत झालेल्या रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापासून काँग्रेस हायकमांड आणि गांधी परिवारातील अंतर संपूर्ण देशानं पाहिलं होतं.

काँग्रेसचे कार्यक्रमही टाळले

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधींनी विजयोत्सवाला उपस्थित न राहता कार्यकर्त्यांची निराशा केली होती. अशा क्षणी त्यांची अनुपस्थिती त्यांच्या नेतृत्वाच्या गांभीर्याबद्दल प्रश्न निर्माण करते.

दिल्लीतही सुरुवातीला गैरहजर

दिल्लीत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की दशकभरानंतर काँग्रेसही सज्ज झाली आहे आणि दिल्लीत चुरशीच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. मात्र तसे झाले नाही. काँग्रेसचा प्रचार कमकुवत होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाशी युती नाकारल्यानंतर खुद्द राहुल गांधींनी केजरीवालांवर पोकळ आश्वासने दिल्याचे आरोप केले होते. त्यामुळे दिल्लीतील निवडणुका या तिरंगी होतील, अशी शक्यता होती. मात्र दिल्लीच्या प्रचारात काँग्रेसचे प्रमुख नेतेच गायब असल्याचे दिसत आहे.

राहुल गांधी आहेत कोठे?

दिल्लीच्या रणधुमाळीत राहुल गांधी कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ना दिल्लीच्या निवडणुकीत, ना कुंभात, ना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात, त्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+