Independence Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण, काय म्हणाले PM समजून घ्या या 10 मुद्द्यात
Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात, बँका, विकास, महिला, युवा, गरीबी, परराष्ट्र धोरण या विषयांसह सर्व बाबींवर देशाला संबोधीत केलं.
आज पंतप्रधानांनी देशाच्या पुढील विकासाची ब्ल्यू प्रिंट सांगितली. शिक्षण पायाभूत सुविधा आणि कष्टकरी, गरीबांचे उत्थान तसंच आगामी भविष्यातील ध्येयधोरणांवरही ते देशवासीयांशी बोलते झाले. पंतप्रधानांचे भाषण या दहा मुद्द्यात आपण जाणून घेऊया.

1. गरीबीतून उत्थान
पीएम मोदी म्हणाले, कोरोनाच्या काळातही काळात देशाची अर्थव्यवस्था वेगवान राहिली. मला कोरोनाचा काळ आठवतो, या दरम्यान सर्वात वेगवान अर्थव्यवस्था राखणारा देश भारत आहे. आपण 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, जेव्हा 100 हून अधिक जिल्हे पुढे जाण्यासाठी आपापसात स्पर्धा करू लागतात, तेव्हा भारताला गती मिळतेजेव्हा आपण लोकांना गरिबीतून बाहेर काढतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. मी तळागाळाबद्दल बोलतोय, आपल्या 10 कोटी भगिनी महिलांच्या स्वयंगटाशी निगडीत आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत. कुटुंबाच्या निर्णयात ती भागीदार बनत आहे. आमचे सीईओ जगभर प्रसिद्धी मिळवत आहेत, तर दुसरीकडे एक कोटी बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत.
2. नावीन्य आणि तंत्रज्ञान
पीएम मोदी म्हणाले- प्रत्येक क्षेत्रात नावीन्य आणि तंत्रज्ञान जोडण्याची गरज आहे. जगातील सर्वोत्तम पद्धती पुढे ठेवून आम्हाला प्रगती करायची आहे. प्रत्येक क्षेत्रात नावीन्य आणण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची गरज आहे. नवीन धोरणांमुळे हे घडत आहे. आपण पूर्ण ताकदीने पुढे जाऊ या, फुलू या, आपली स्वप्ने जगू या, सिद्धी जवळून पाहू या, आत्मसात करू या, या दिशेने वाटचाल करू या. आम्ही मिशन मोडवर काम करत आहोत.
3. जगातील सर्वात मजबूत बँकींग
पीएम मोदी म्हणाले, आमच्या बँकांनी जगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये स्थान निर्माण केले आहे. बँकिंग क्षेत्राची काय स्थिती होती, ना आत्मविश्वास वाढला. जे कारनामे झाले ते बँक संकटातून जात होते. जेव्हा आम्ही सुधारणा केली तेव्हा आमच्या बँकांनी जगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये स्थान मिळवले. बँकिंग क्षेत्र मजबूत असेल तर विकासही होतो, आपल्या तरुणांना शिक्षणासाठी आणि परदेशात जाण्यासाठी कर्जाची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे, रस्त्यावरील विक्रेतेही कर्ज घेऊन विकासाचे भागीदार होत आहेत.
4. विकासाची ब्ल्यू प्रिंट
मोदी म्हणाले, आमची सुधारणा ही विकासाची ब्लू प्रिंट आहे, गरीब, वंचित आणि तरुणांच्या संकल्पांना आणि आकांक्षांना आम्ही आकार दिला. आमच्या सुधारणा चार दिवसांच्या टाळ्यासाठी नाहीत. मी आज म्हणू शकतो की आमची सुधारणा ही विकासाची ब्लू प्रिंट आहे. राजकीय मजबुरीमुळे आम्ही हे केले नाही. हे राजकारणाच्या राजकारणात भागाकार आणि गुणाकार करून झाले नाही. हे सर्व प्रथम राष्ट्र घडवण्याचा आणि आपला भारत महान बनवण्याच्या संकल्पाने करतो. उत्पादक क्षेत्र जगातील हब बनेल त्यातून युवकांचे सामर्थ दिसून येईल.
5. विकास आणि सुधारणा
जेव्हा राजकीय नेतृत्वाची जिद्द, दृढ विश्वास असतो आणि देशातील नागरिक पुढे येतात, तेव्हा निश्चित परिणाम मिळतात. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके आपण असेच जगलो, असे घडते, आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला संधी मिळाली आहे, त्याचा आनंद घ्या, आपण काहीतरी नवीन करायला गेलो तर अराजक होईल. असे वातावरण होते. लोक म्हणायचे, विसरायचे काय, ही मानसिकता मोडायची आहे. पुढच्या पिढीसाठी काम का करायचं, असं अनेकजण म्हणायचे. आता त्यात बदल करण्यात आला आहे. तो सुधारणांची वाट पाहत राहिला, आम्ही जमिनीवर सुधारणा आणल्यात.
6. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाचे सैन्य सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करते. नवीकरणीय ऊर्जेसाठी वचनबद्ध, भारताने जी-20 देशांनी जे काही केले आहे त्याहून अधिक केले आहे. आपण कोरोना कसे विसरू शकतो? आम्ही जगातील करोडो लोकांना लस दिली. एक काळ असा होता की दहशतवादी मारून तेथून निघून जायचे. आता जेव्हा देशाचे सैन्य सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक करते तेव्हा देशवासीयांना अभिमान वाटतो. आमचे तिन्ही सुरक्षादल, स्पेस सेक्टर त्यात महिलांचे योगदान आहे. डिफेन्स बजेटमध्ये आपण आत्मनिर्भर झालो आहोत, आपल्या संरक्षण साहीत्य उत्पादक कंपन्यांची जगात ओळख निर्माण केली आहे.
7. शिक्षण आणि मातृभाषा
पीएम नरेंद्र मोदी यांनी शिक्षण आणि मातृभाषेवर आपल्या भाषणात भर दिला. ते म्हणाले, जे झाले त्यात समाधान माननारे लोक नाही, ते आमच्या संस्कारात नाही. विकासाला, समृद्धीला आणि स्वप्नांना साकार करण्याचा आम्ही आपला आणि देशवासीयांचा स्वभाव बनवत आहोत. आज नवीन शिक्षा नितीत अनेक राज्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे एकवीसाव्या शतकात त्याला बळ मिळत आहे.
विकसीत भारताच्या स्वप्नांना त्यातून बळ मिळत आहे. देशातील तरुणांना विदेशात शिक्षणासाठी पाठवण्याची गरज पडू नये. मध्यमवर्गीयांचे शिक्षणातील खर्च वाचवण्याचा प्रयत्न आहे. नालंदा विद्यापीठाचा पुर्नविकास केला आहे. तेव्हाची शिक्षणव्यवस्था आज तशीच असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. नव्या शिक्षा धोरणामुळे देशातील गुणवत्ता वाढली आहे. मातृभाषेचे सामर्थ देशातील गरीब कुटुंबाचेही स्वप्न पुर्ण करु शकतील. त्यासाठी मातृभाषेला बळ देण्याची गरज आहे.
8. गुणवत्तापुर्ण मनुष्यबळ
पीएम नरेंद्र मोदी ग्लोबल जाॅब मार्केटमध्ये भारताचा युवक आपले स्थान निर्माण करेल. यासाठी आपण युवकाला कौशल्य प्रशिक्षण देत आहोत. सायन्स आणि टेक्नाॅलाॅजी महत्वाची आहे. केंद्र शासन संशोधन संस्था वाढवत आहोत. त्यातून संशोधनाला बळ मिळेल. यासाठी एक लाख कोटी रुपये संशोधन आणि नाविण्यासाठी तरतुद केली आहे. युवकांची कल्पनाशक्ती त्यासाठी उपयोगी पडेल त्यातून नविन शोध लागतील. वैद्यकीय व्यवस्थाही आपण सुधारत आहोत. विदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जायची गरज पडणार नाही. पुढच्या पाच वर्षात 75 हजार वैद्यकीय सीट्स तयार केल्या जातील.
9. कृषी व्यवस्था
कृषी हा आपल्या जीवनाचा भाग आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ आणि मालाला मुल्य मिळेल, यासाठी प्रयत्न केले आणि करत आहोत. दिवसेंदिवस जमिनीची पोषकता कमी होत आहे. मी त्यांचा आभारी आहे जे नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत आहेत. अर्थसंकल्पातही आपण त्यासाठी तरतूद केली आहे. नैसर्गिक अन्न सेवन हे महत्वाचे आहे. ऑरगॅनिक फूड निर्मितीत आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांना आरोग्य, त्यांच्या मुलांना शिक्षण आणि रोजगार मिळावा यासाठी सरकार म्हणून प्रयत्नशील आहोत.
10. महिला सुरक्षा
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या माता, भगिनीवर अत्याचार होत आहेत. त्याला आपल्या सर्व राज्य सरकारांनी गंभीरतेने घ्यायला हवे. राक्षसीकृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. बलात्काराची घटना घडते तेव्हा खूप व्यापक चर्चा होती, पण हे पाप करणाऱ्यांचीही चर्चा व्हायला हवी, त्यामुळे त्यांच्यात भय उत्पन्न होईल.












Click it and Unblock the Notifications