PM Kisan 28 हजार शेतकऱ्याना पीएम किसानचा हप्ता! पीएम मोदींकडून 62 कोटी! 'हे' काम केले तरच मिळेल पैसे
PM Kisan 21st Installment update e-KYC Mandatory : पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली असून आज रविवार, 9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 62 कोटी रुपये जमा केले आहेत, त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपयांचा 21 वा हप्ता प्राप्त होणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. केंद्र सरकारकडून लवकरच हा हप्ता जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु जर तुम्ही 'ई-केवायसी' (e-KYC) पूर्ण केले नसेल, तर तुमचे ₹2,000 खात्यात येणार नाहीत!
मागील ट्रेंडनुसार, 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 हजार शेतकऱ्यांसाठी 62 कोटी रुपये जाहीर करत ते त्यांच्या खात्यात जमा केले आहेत. ते हस्तांतरीत होत असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत आहेत.
पैसे हवे असतील तर 'हे' काम लगेच पूर्ण करा..
योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे काम न केल्यास, तुमचा हप्ता अडकू शकतो.
OTP-आधारित e-KYC: तुम्ही PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) जाऊन OTP-आधारित e-KYC घरबसल्या पूर्ण करू शकता.
बायोमेट्रिक-आधारित e-KYC: याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC (Common Service Center) केंद्राशी संपर्क साधावा लागेल.
लक्षात ठेवा: ज्या शेतकऱ्यांनी 20व्या हप्त्यापूर्वी e-KYC आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाच पुढील किस्त मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येक 2,000 रुपये) दिले जातात.
पीएम किसान योजना काय आहे, थोडक्यात..
- शेतकरी कुटुंबांना त्यांच्या शेती आणि संबंधित कामांसाठी तसेच घरगुती गरजांसाठी पूरक उत्पन्न (Supplementary Income) उपलब्ध करून देणे.
- शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर आणि थेट आर्थिक मदत करणे, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
- शेतकऱ्यांचे खासगी सावकारांवरील किंवा इतर कर्जावरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी करणे.
- 'DBT' प्रणालीमुळे निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो, ज्यामुळे योजनेत पारदर्शकता येते आणि मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येते.
- PM किसान योजना ही शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेतीत गुंतवणूक करण्यासाठी थेट मदत पुरवणारी महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे.












Click it and Unblock the Notifications