Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कासवाचा ओडिशा ते गुहागर 3500 किमीचा थक्क करणारा प्रवास, शास्त्रज्ञ ही विचारत पडले, काय आहे कारण

रत्नागिरी जिल्ह्यातून एक खास बातमी समोर आली आहे. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने 3,500 किलोमीटर अंतर कापून एक नवा इतिहास रचला आहे. हे कासव ओडिशाहून महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर पोहून आले आहे. हे कासव रत्नागिरीच्या गुहागर बीचवर आढळून आले आहे. त्यावेळी या कासवाने 120 अंडी घातली आहेत आणि त्यापैकी 107 अंड्यांपासून पिलांना जन्म दिला आहे.

ही संपूर्ण घटना 27 जानेवारी 2025 रोजी समोर आली आहे. या कासवाला 2021 मध्ये ओडिशातील गहिरमाथा बीचवर टॅग करुन सोडण्यात आलं आले होते. त्याचा टॅग क्रमांक '03233' होता. त्यावेळी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) च्या शास्त्रज्ञांनी 12,000 कासवांना टॅग केले होते.

Olive Ridley

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले कासव

ओडीशाहून हे कासव रत्नागिरीतील गुहागरच्या बीचवर पोहचल्यावर शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना आशा होती की हे कासवे श्रीलंकेत परत येतील, परंतु '03233' क्रमांकाचे कासव अरबी समुद्राकडे निघाले आणि ते थेट रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचं , शास्त्रज्ञांनाकडून सांगण्यात येत आहे.

2021 मध्ये कासवाला लावण्यात आले होते टॅग

या कासवाचा टॅग क्रमांक o3233 आहे. झेडएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी या कासवाला टॅग केले होते. डॉ. त्रिपाठी हे भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) मध्ये एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. 18 मार्च 2021 रोजी ओडिशातील गहिरमाथा समुद्रकिनाऱ्यावर सामूहिक घरटे बांधण्याच्या मोहिमेदरम्यान त्यांनी या कासवाला टॅग केले. टॅगिंग म्हणजे कासवाच्या पंखावर एक खूण करणे जेणेकरून ते ओळखता येईल.

डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी या कासवाच्या प्रवासाला खूप खास म्हटलं आहे. या घटनेमुळे शास्त्रज्ञांना कासवांच्या स्थलांतराबद्दलची त्यांची समज बदलण्यास भाग पाडलं आहे. पूर्वी असे मानले जात होते की, कासवे पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी घरटे बांधतात. आता या कासवाच्या प्रवासाने हा विचार चुकीचा असल्याचे सिद्ध केले आहे. आता शास्त्रज्ञांना असे वाटते की ऑलिव्ह रिडले कासवे लांब अंतर प्रवास करू शकतात. म्हणून दोन्ही किनाऱ्यांवरील त्यांच्या घरट्यांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. शास्त्रज्ञ अजूनही या खास कासवावर लक्ष ठेवून आहेत. अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अभ्यासामुळे कासवांचे संवर्धन आणि वर्तन समजून घेण्यास मदत होईल.

ओडिशा नंतर महाराष्ट्रात प्रजनन

वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. सुरेश कुमार यांनीही आपले मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की हे कासव दुहेरी प्रजनन धोरण स्वीकारत असेल. कदाचित त्यांनी ओडिशामध्ये प्रथम अंडी घातली असतील. मग तो महाराष्ट्रात आला आणि पुन्हा अंडी घातली. 90 च्या दशकात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला श्रीलंकेतून ये-जा करणाऱ्या कासवांबद्दल आपल्याकडे भरपूर डेटा आहे.

दरम्यान या प्रकरणात पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील कासवे एकमेकांना भेटत असण्याची आणि दुसऱ्या किनाऱ्यावर प्रवास करण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त मादी कासवांसाठी बाळांच्या लिंग गुणोत्तराशी खेळण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो, जो तापमान आणि आर्द्रतेवर अवलंबून असतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+