National Panchayati Raj Day 2025 : पंचायत राज व्यवस्था म्हणजे काय, इतिहास, महत्त्व, घ्या जाणून
National Panchayati Raj Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय पंचायती राज दिन 2025 निमित्त बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झांझारपूर ब्लॉकमध्ये असलेल्या लोहाना उत्तर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान ते देशभरातील पंचायत प्रतिनिधींना संबोधित करतील आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 प्रदान करणार आहेत.
दरम्यान 24 एप्रिल 2025 रोजी देशभरात पंचायत दिन साजरा केला जातो. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधुबनीतील झांझरपूर येथील बिदेश्वर स्थान येथे आयोजित कार्यक्रमात देशभरातील ग्रामसभांना संबोधित करणार आहेत. या सोहळ्यादरम्यान, पंतप्रधानांनी 13,500 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये रेल्वे प्रकल्प, एलपीजी संयंत्र आणि गृहनिर्माण योजनांचा समावेश आहे. तसेच, या कार्यक्रमात विशेष श्रेणीतील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये समस्तीपुरच्या मोतीपुर पंचायतीला 'क्लायमेट अॅक्शन विशेष पंचायत पुरस्कार' मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मधुबनी येथील बिदेश्वर स्थान येथे आयोजित कार्यक्रमात देशभरातील ग्रामसभांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात 13,500 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे. याशिवाय, पंतप्रधानांनी एलपीजी संयंत्र आणि गृहनिर्माण योजनांसारख्या प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
राष्ट्रीय पंचायती राज दिन: इतिहास आणि महत्त्व
राष्ट्रीय पंचायती राज दिन दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योगदानाचा उत्सव आहे. 1993 मध्ये 73व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला, ज्यामुळे ग्रामीण भागात लोकशाही मजबूत झाली.
24 एप्रिल 1993 रोजी हा कायदा लागू झाला आणि त्यानंतर 2010 पासून हा दिवस राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश पंचायती राज संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हा आहे. पंचायती राज व्यवस्था ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका बजावते. या संस्था स्थानिक समस्यांचे निराकरण करतात आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.
पंचायती राज व्यवस्था
भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा पाया बलवंत राय मेहता यांनी रचला. त्यांना या व्यवस्थेचे जनक मानले जाते. गावांमध्ये लोकशाहीची मुळे मजबूत करण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय व्यवस्थेची कल्पना केली होती. 1992 मध्ये 73 वी घटनादुरुस्ती लागू झाल्यानंतर भारतात पंचायती राज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्यात आली. तथापि, बिहारमधील परिस्थिती थोडी वेगळी आहे.












Click it and Unblock the Notifications