महावीर जयंतीनिमित्त त्यांचे 'हे' मौल्यवान विचार, जे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरतील
Mahavir Jayanti 2025 wishes : दरवर्षी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी जैन धर्माचे अनुयायी महावीर जयंती साजरी करतात. महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म झाला. मान्यतेनुसार त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला बिहारमधील कुंडा गावात झाला. यावर्षी तिथीनुसार भगवान महावीर जयंती 10 एप्रिल रोजी साजरी केली जाईल.
या दिवशी भगवान महावीरांना सोन्या-चांदीच्या भांड्यांनी अभिषेक केला जातो. जैन मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि विधी असतात. सकाळी मिरवणुका आणि रॅली काढली जाते. दानधर्म करा. जैन लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. चला जाणून घेऊया भगवान महावीरांचे असे मौल्यवान विचार, जे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरतात.

भगवान महावीर यांचे मौल्यवान विचार
- अहिंसा हा सर्वात मोठा धर्म आहे. जो सर्वांच्या कल्याणाची कामना करतो.
- खरा शत्रू तुमच्या आतच राहतो. तो शत्रू म्हणजे क्रोध, अभिमान आणि लोभ आहे, त्याला आतून काढून टाका. तुमच्या आत्म्यापलिकडे कोणाताही शत्रू नाही.
- प्रत्येक आत्मा स्वतः सर्वज्ञ आणि आनंदी आहे. आनंद बाहेरून येत नाही, तो व्यक्तीच्या आत असतो.
- देव इतरांशिवाय अस्तित्वात नाही आणि प्रत्येकाने योग्य दिशेने प्रयत्न केल्यास त्याला देवत्व प्राप्त होऊ शकतो.
- एखाद्याचे अस्तित्व नष्ट करण्याऐवजी त्याला शांततेत जगू द्या आणि समाधानात जगू द्या तरच तुमचे कल्याणण होईल.
- स्वत:शी लढा बाहेरील शत्रूशी काय लढायचे ते सहज साध्य आहे.
- देवाचे वेगळे अस्तित्व नाही. महावीरजी म्हणाले की प्रत्येक व्यक्ती योग्य दिशेने सर्वोच्च प्रयत्न करून देवत्व प्राप्त करू शकते.
- स्वत :वर विजय मिळवणे हे लाखो शत्रूंवर विजय मिळवण्यासारखे आहे.
- मानव स्वतःच्या चुकांमुळे दुःखी असतो आणि तो आपल्या चुका सुधारून आनंदी होऊ शकतो.
- खरा शत्रू व्यक्तीमध्ये असतो, ते शत्रू म्हणजे क्रोध, अभिमान, लोभ, आसक्ती आणि द्वेष. लाखो शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले.












Click it and Unblock the Notifications