स्थिर सरकाराची झारखंडची परंपरा; यावेळी नक्की काय होणार..?
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला म्हणजेच दोन टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होत आहे. सध्या झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चासह इतर पक्षांचे सरकार आहे. बिहारच्या दक्षिणेकडील भुभाग स्वतंत्र करुन 2000 साली झारखंड स्वतंत्र राज्य करण्यात आले. तेव्हापासून आत्तापर्यंत सात चेहऱ्यांच्या आसपास झारखंडचे राजकारण फिरत राहिले आहे.
कसे होते झारखंडमधले पहिले सरकार
2000 सालात झारखंड स्वतंत्र झाले. त्यावेळी बिहार विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांनीच ही विधानसभा चालवली. त्यावेळी कुणा एका पक्षाला बहुमत नव्हते. त्यानंतर पहिल्यांदा 2005 साली झारखंड विधानसभेची पहिली निवडणूक 3 ते 23 फेब्रुवारी पर्यंत तीन टप्प्यांत घेण्यात आली. त्यावेळी 81 सदस्य निवडण्यात आले. दुसरी झारखंड विधानसभेची निवड करण्यासाठी स्वतंत्र झारखंडमधील ही पहिली निवडणूक होती.

2000 च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीवर आधारित पहिली झारखंड विधानसभेची स्थापना करण्यात आली होती. या पहिल्या निवडणुकीचा परिणाम पहिल्याप्रमाणे त्रिशंकू विधानसभा राहिला. कोणत्याही एका पक्षाला किंवा निवडणूकपूर्व आघाडीला बहुमत मिळाले नाही. त्यावेळी सर्वाधिक 30 जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. झारखंड मुक्ती मोर्चाला 17 तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या होता.
पहिल्या सरकारची निर्मिती
2005 साली निवडणूक झाल्यानंतर सत्तास्थापनेचा 41 आकडा कोणत्याही पक्षाला ओलांडता आला नाही. त्यावेळी भाजपला 30, झारखंड मुक्ती मोर्चाला 17, काँग्रेसला 09, राष्ट्रीय जनता दलाला सात, जदयूला सहा, आजसू ला दोन जागा निवडून आणता आल्या. या विधानसभेत तब्बल 10 अपक्षांनी यश मिळवलं. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन यांनी काँग्रेसह सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र त्यावेळी वाद निर्माण झाला, आणि सोरेन यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने नऊ दिवसांनंतर म्हजेच 11 मार्चला त्यांना राजीनामा द्यावा लागला.
भाजपचे अर्जून मुंडा मुख्यमंत्री
त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे अर्जुन मुंडा हे 2005 साली दुसरे मुख्यमंत्री बनले. मात्र हे सरकार फक्त दीड वर्षे चालू शकले. मधु कोडा आणि इतर तीन अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि ते अल्पमतात आणले आणि मुंडा यांचा 2006 साली राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीने गोवा पक्ष , फॉरवर्ड ब्लॉक आणि 3 अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर पहिल्यांदा अपक्ष मधू कोडा यांनी तिसरे स्वतंत्र मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी ते फक्त 35 वर्षांचे होते.
कोडा सरकार दोन वर्षांनंतर पडले
17 ऑगस्ट 2008 ला झारखंड मुक्ती मोर्चाने कोडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर शिबू सोरेन पुन्हा मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी शिबु सोरेन हे खासदार होते. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना विधानसभेची निवडणूक लढविणे आवश्यक होते. परंतु पोटनिवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर 12 जानेवारी 2009 त्यांना राजीनामा द्यावा लागला. अखेर त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
आत्ताची स्थिती काय
झारखंड राज्याची निर्मीती झाल्यानंतर तेथे आत्तापर्यंत कायम अस्थिर सरकार राहिल्याचा इतिहास आहे. यावेळी भाजपने या राज्याच्या निवडणुकीची चांगली तयारी केली आहे. 81 सदस्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत यंदाही भाजपचे पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे. येत्या 20 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक होऊन 23 तारखेला विधानसभेचा निकाल लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications