Independence Day : कधी तयार झाला भारताचा राष्ट्रध्वज, तिरंगा ध्वजातील रंगांचा अर्थ काय? वाचा इतिहास
Independence Day 2024 : प्रत्येक देशाची ओळख आणि प्रतीक हे राष्ट्रध्वज आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री लाल किल्ल्यावर भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि भारत देश स्वातंत्र्य झाला. राष्ट्रध्वजालाच आपण तिरंगाही म्हणतो.
आपला तिरंगा ध्वज कधी तयार झाला? तिरंगा ध्वजातील रंगाचा अर्थ काय? अशोक चक्र कशाचे प्रतिक आहे आणि इतिहास माहीत आहे काय? चला तर आपण आपल्या राष्ट्रध्वजाबाबत माहीत जाणून घेऊया.

तिरंगा स्वराज्य ध्वजावर आधारीत...
भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा नावाने ओळखला जातो. यामध्ये केसरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंग आहेत.यात निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे. 22 जुलै 1947 रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला. भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो. हा ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडे अधिकार
कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा किंवा रेशमाचा असावा. ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे, जो प्रादेशिक गटांना त्याचे वाटप करतो. 2009 पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाचा एकमेव निर्माता होता. ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्यांद्वारे नियंत्रित केला जातो.
राष्ट्रध्वजात चार रंगाचा वापर
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा या चार रंगाचा वापर केला गेला आहे. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे.
राष्ट्रध्वजातील रंग कशाचे प्रतिक?
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व विशद केले आहे. त्यानुसार, केशरी रंग किंवा भगवा रंग हा त्यागाचा द्योतक आहे, पांढरा रंग प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा प्रतिनिधी आहे, तर हिरवा रंग मानवाचे निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो.
- ध्वजाचा वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.
- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो.
अशोक चक्राविषयी थोडेसे..
जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला 'अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. 'धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.
आधी होते चरख्याला स्थान
1921 मध्ये, आंध्र प्रदेशातील पिंगली व्यंकय्या यांनी देशाची एकता दर्शवण्यासाठी भारताच्या तिरंगा ध्वजाची रचना केली. त्यावेळी तिरंग्याला भगव्या रंगाऐवजी लाल रंग होता. लाल रंग हिंदूंसाठी होता, हिरवा रंग मुस्लिमांसाठी होता आणि पांढरा रंग इतर धर्मांचे प्रतीक होता. प्रगतीचे लक्षण म्हणून चरख्याला ध्वजात स्थान देण्यात आले.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications