Health Tips : उन्हाळ्यात काय खावे-काय खाऊ नये; नाश्ता-दुपारचे अन् रात्रीच्या जेवणात काय बदल करावा?
What to Eat and What Not to Eat in Summer : कडाक्याचे ऊन आणि अंगाची होणारी लाही लाही यामुळे उन्हाळ्यात जीव अगदी कासावीस होतो. या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण अतिशय झपाट्याने वाढते. त्यामुळे भूक मंदावते आणि ओबड धोबड खाण्यात आल्याने पचन क्षमताही बिघडते.
त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात आहारात बदल करण्याची गरज आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी आज आपण बेसिक माहिती जाणून घेणार आहोत...!

उन्हाळ्यात हे खावे
- उन्हा्ळ्याच्या दिवसात ताजे पचायला हलके असणार्या पदार्थाचा आहारात समावेश करावा.
- या दिवसात कलिंगड ,संत्री, मोसंबी, द्राक्ष, अननस, सफरचंद ही हंगामी फळे किंवा शक्य झाल्यास याचा ताजा ज्यूस प्यावा.
- लिंबू पाणी, ताक, शहाळे, नाचणीची आंबील, कैरीचे पन्हं यांचेही सेवन करावे.
- आहारात हिरव्या भाज्या, ज्वारी, नाचणी, कडधान्ये, वरणभात या हलक्या पदार्थांचा समावेश करावा.
- आहारात दूध, तूप, दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा.
- कांदा, काकडी, गाजर, पुदीना, कलिंगड या ग्रीनरेड सॅलेडचा आहारात समावेश करावा.
हे खाणे टाळावे
- अति तेलकट, तिखट, फास्टफूड पदार्थ टाळावेत कारण यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होऊ शकतो.
- शीतपेयं घेणे शक्यतो टाळले जावे. जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत.
- मासे, अंडी, मांसाहाराचे प्रमाण कमी असावे.
- आहारात तळलेले पदार्थ, लोणचे, चटण्या खाणे टाळावे.
- आहारात अति उष्ण पदार्थांचे सेवन करणे टाळा.
- बाहेरचे आणि अति थंड पाणी पिणे टाळा.
- चहा-क़ॉपीचे सेवन शक्य झाल्यास टाळा.
- मद्यपान आणि धुम्रपान करू नका.
उन्हाळ्यात आहारात कसा बदल करावा...!
नाश्यात काय बदल करावा?
बऱ्याच लोकांना नाश्त्यामध्ये ब्रेड, पराठा किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु, उन्हाळ्यात या ऐवजी दही खाणं जास्त फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे पोट तर भरेलच पण तुमच्या शरीराला थंडावाही मिळेल.
दुपारच्या जेवणात काय बदल करावा?
जास्त तेल, मीठ आणि मसाले घालून पदार्थ शिजवण्यापेक्षा कमी मसाले असलेला माशांचा रस्सा, भात, भाज्या आणि डाळी कमी मसाल्यात खाणे चांगले. तसेच सॅलडमध्ये मुख्यतः काकडी खाणे चांगले.
दुपारच्या जेवणात भाज्या आणि फळे खा. ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, अशा भाज्या आणि फळांची निवड करा. जेवण आणि फळ एकत्र गहू नका. त्यामध्ये थोडे अंतर ठेवा.
रात्रीच्या जेवणात काय घेतले पाहिजे?
रात्री हलके खाणे चांगले. अशावेळी भाज्या आणि चिकनसोबत सूप घेतले जाऊ शकते. चपाती, कधी पकोडा असे पदार्थही खाऊ शकता. रात्री थोड्या प्रमाणात अन्न खाल्ल्याने तुम्हाला चांगली झोप लागते.












Click it and Unblock the Notifications