राज्यात पूर परिस्थिती! पावसाळी आजारांचा हा धोका, जाणून घ्या आरोग्याची कशी घ्यावी काळजी
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून गावामध्ये,वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
गावांमध्ये वस्तीमध्ये पाणी शिरल्यानंतर पाण्यासोबत इतर कचरा, घाण देखील येत असते. या पाण्याच्या पुरामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता असते.

पूर आल्यानंतर अतिसार, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ, डेंगू, श्वसन विकार,त्वचा विकार यांचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित आजारांची लक्षणे दिसताच नागरिकांनी तातडीने वैद्यकीय मदत घेण्याची गरज असते. कारण कोणत्याही प्रकारच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
आजार आणि त्यावरील उपाय...
1- अतिसार :
पाण्याच्या सततच्या संपर्कामुळे महापुरानंतर किंवा या कालावधीतच अतिसार होऊ शकतो. तापासह किंवा तापाविना पातळ जुलाब होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत त्यामुळे वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे तसेच पाणी उकळून शुद्ध करून पिणे देखील गरजेचे आहे.
2-कावीळ...
अशुद्ध पाणी आणि अन्नामुळे पावसाळ्यात कावीळ आजार होऊ शकतो.कावीळ मुख्यत्वे विषाणू ए आणि ई मुळे होतो. थकवा येणे, लघवीचा किंवा डोळ्यांचा रंग पिवळा होणे,उलटी येणे, यकृतामध्ये बिघाड होणे आधी लक्षणे दिसून आल्यास तातडीने तपासणी करावी. डोळे लालसर होणे हेही एक लक्षण आहे.पाणी उकळून शुद्ध करून प्यावे व स्वच्छ आणि ताजे अन्न खावे.
3- लेप्टोस्पायरोसिस..
अशुद्ध पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस ची लागण होते.जळजळ होणे, अंगदुखी,डोकेदुखी, ताप ही सर्वसाधारण लक्षणे आहेत. जर शरीरावर कुठेही कापलेले किंवा जखम झालेली असेल आणि तुमचा संपर्क पुराच्या पाण्याची आला असेल तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणत्याही लक्षणाची वाट न पाहता औषध उपचार करून घेणे आवश्यक आहे. ताप पाच किंवा सात दिवस राहिला तर रक्ताची चाचणी करून योग्य निदान केले जाते. आजार झाल्यावर महिनाभर खाण्यापिण्याचे पथ्य पाळले तर पुन्हा उद्भवत नाही त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
4- श्वसन विकार...
श्वसन विकार या आजारात संसर्गजन्य श्वसन विकार दिसून येतात.हात,शरीर स्वच्छ ठेवण्याबाबत काळजी घ्यावी. श्वसनासंदर्भात कोणत्याही आजार दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा तसेच तातडीने उपचार करावेत.
5- डेंगू..
ताप, डोकेदुखी यासारखी लक्षणे या आजारात दिसून येतात. पुरानंतरच्या पाण्याचा स्पर्श होऊ न देणे व शरीर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर आजारांची लक्षणे दिसतात तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी पावसाळ्यामध्ये आणि पूर आल्यानंतर आरोग्याची आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे....












Click it and Unblock the Notifications