धक्कादायक! हेअर ट्रान्सप्लांटनंतर दोघांचा मृत्यू! केस वाढवण्याची ही पद्धत खरंच सुरक्षित आहे का? वाचा
Hair transplant : डोक्यावरील केस आणि व्यक्तिमत्व याचा संबंध अनेकदा महत्वाचा वाटतो. अशातच अनेकांना डोक्यावर केस नसतील तर ते हेअर ट्रान्सप्लाँटकडे वळतात. आता हेअर ट्रान्सप्लाँट सर्रास केले जात आहे. अशाताच हेअर ट्रान्सप्लाँट करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका खाजगी क्लिनिकमध्ये केस प्रत्यारोपणानंतर दोन अभियंत्यांच्या मृत्यू झाला सर्वांनाच धक्का बसला आहे. टक्कल पडल्यानंतर हेअर ट्रान्सप्लाँट करू इच्छिणाऱ्यांसाठी ही घटना चिंतेचा विषय बनली आहे. केस प्रत्यारोपण ही अनेकदा सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया मानली जाते, पण ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.

हेअर ट्रान्सप्लाँट खरेच जीवघेणे असू शकते का?
हेअर ट्रान्सप्लाँट करणाऱ्यांसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे तज्ज्ञ काय सांगतात, त्यांनी या घटनेवर काय मत केले हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
केस प्रत्यारोपण म्हणजे काय?
तज्ज्ञ सांगतात की, केस प्रत्यारोपण ही एक शस्त्रक्रिया आहे; ज्यामध्ये केसांची मुळं डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागात हस्तांतरित केली जातात. याला केस पुर्नरोपण करणे असेही म्हणतात. हे करण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत:
एफयूटी - FUT (फोलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन)
यामध्ये, डोक्याच्या मागच्या भागातून त्वचेची एक पट्टी काढली जाते ज्यामध्ये हजारो केसांची मुळे असतात. हे लहान कलमांमध्ये विभागले जातात आणि टक्कल पडलेल्या भागात रोपण केले जातात.
एफयुई- FUE (फोलिक्युलर युनिट एक्सट्रॅक्शन) -
यामध्ये, त्वचेच्या पट्ट्या न काढता केसांची मुळे एक-एक करून काढली जातात. यात टाके घालण्याची गरज नसते आणि लवकरच ते ठीक होते. FUE मध्ये, केस केवळ डोक्यावरूनच नाही तर दाढी, छाती, पोट किंवा जघन क्षेत्रातील केस देखील काढले जाऊ शकतात.
केस प्रत्यारोपण कोण करू शकते?
- या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकजण योग्य नाही. हे यासाठी फायदेशीर आहे:
- ज्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला पुरेसे दाता केस आहेत
- ज्यांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे केस गळणे स्थिर आहे.
- ज्यांना कोणताही गंभीर वैद्यकीय आजार नाही (जसे की अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग)
- जर एखाद्याला अलोपेशिया एरियाटा किंवा कोणताही त्वचेचा आजार असेल तर केस प्रत्यारोपण टाळावे.
केस प्रत्यारोपणापूर्वी ही खबरदारी घ्या
गुणवत्तापुर्ण आणि पात्र सर्जन निवडा: केसांचे प्रत्यारोपण नेहमीच नोंदणीकृत त्वचारोगतज्ज्ञ किंवा प्लास्टिक सर्जनकडूनच करा. त्यांना एमसीआय (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) कडून मान्यता असणे आवश्यक आहे.
क्लिनिकची खात्री करा: क्लिनिकमधील उपकरणे, स्वच्छता आणि आपत्कालीन सुविधांबद्दल खात्री करा. रुग्णालयात आयसीयूची सुविधा असेल तर बरे होईल.
वैद्यकीय इतिहास : तुमचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास, अॅलर्जी, औषधे आणि कोणतेही जुनाट आजार डॉक्टरांना सांगायला विसरू नका.
शारीरिक चाचण्यांना प्राधान्य द्या : शस्त्रक्रियेपूर्वी, रक्तदाब, साखर, ईसीजी इत्यादी आवश्यक चाचण्या करा.
खूपच स्वस्त दर, ऑफर्सच्या भानगडीत पडू नका : अत्यंत स्वस्त ऑफर्स किंवा अज्ञात सोशल मीडिया जाहिरातींना बळी पडू नका. स्वस्त शस्त्रक्रिया घातक ठरू शकते.
शस्त्रक्रियेनंतर काळजी घ्या : डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्या, टाळू स्वच्छ ठेवा आणि उन्हापासून संरक्षण करा.
फॉलो-अपला वेळेवरच जा : शस्त्रक्रियेनंतर एक ते दोन आठवडे डॉक्टरांशी नियमित संपर्कात रहा जेणेकरून कोणत्याही समस्या त्वरित लक्षात येतील. तुमच्या बाबतीत कोणते तंत्र - FUE किंवा FUT - चांगले असेल ते डॉक्टरांना स्पष्टपणे विचारा.
हेअर ट्रान्सप्लाँटनंतर केस परत कधी वाढतात?
- केस पुर्नरोपणानंतर काही ठाराविक कालावधीत केस यायला आणि वाढायला लागतात. 3 ते 4 महिन्यांत 10 ते 20 टक्के केसांची वाढ होते.
- 6 महिन्यात 50 टक्के निकाल दिसून येतो.
- 9 महिन्यांत 80 टक्के केसांची वाढ पूर्ण होते आणि 12 महिन्यांत जवळजवळ 100 टक्के केसांची वाढ पूर्ण होते.
- ही प्रक्रिया व्यक्तीच्या शरीरावर आणि आरोग्यावर देखील अवलंबून असते.
हेअर ट्रान्स्प्लाँटनंतर काय काळजी घ्यावी?
तुमचे डोके स्वच्छ ठेवा आणि उन्हापासून दूर ठेवा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणि अँटीबायोटिक्स वेळेवर घ्या.
आठवडाभर जड व्यायाम टाळा. जर टाळूला खाज येत असेल किंवा सूज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शॅम्पूने केस धुण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दुष्परिणाम होतात का?
तज्ज्ञांनी केसरोपणाची प्रक्रिया सामान्यतः सुरक्षित आहे असे म्हटले आहे, परंतु त्याचे काही सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात हेही त्यांनी सांगितले. यामध्ये टाळूवर कवच तयार होणे, सौम्य वेदना किंवा सूज, सुन्नपणा किंवा मुंग्या येणे, त्वचा घट्ट होणे ही लक्षणे काही दिवसात स्वतःहून निघून जातात. जर ते सात दिवसांपेक्षा जास्त काळ टिकले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही तज्ज्ञ सांगतात.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications