आहारातील 'या' गोष्टी काढून टाकल्या तर वाढणार नाही वजन! राहाल निरोगी
Health Tips : भारतात हवामानुसार आहारात बदल केले जातात. हिवाळा सुरु झाला की थंडीचा फार पटकन परिणाम शरीरावर होतो. त्यानुसार आहारात बदल केला जातो. हिवाळ्यात गरम पदार्थ खावे लागतात. आपल्या आहाराबाबत आपण हवामानानुसार पथ्य पाळले तर आपले शरीर हवामानाशी जुळवून घेत. पण ऋतूनुसार आहारात बदल करण्यामागे आणखी काही कारणे आहेत. आणि त्यातील एक कारण म्हणजे ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करणे.
हिवाळ्यात तंदुरुस्त राहणे आणि वजन नियंत्रित करणे, शरीराला संसर्गापासून वाचवण, मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. हे थोडे कठीण असतचं. पण जर तुम्ही तुमच्या आहारातून काही गोष्टी काढून टाकल्या तर तुम्ही तंदुरुस्त तर राहालच पण आजारांपासूनही दूर राहू शकता. या गोष्टी कोणत्या आहेत पाहूयात.

वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात
हिवाळ्यात थंडीमुळे आपण अनेकदा अशा गोष्टी खातो ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते. चला जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल ज्या आपण आपल्या आहारापासून दूर ठेवल्या पाहिजेत.
तळलेल्या गोष्टी टाळाच!
हिवाळ्यात समोसे, पकोडे, पुरी या असे पदार्थ म्हणजेच काय तर तळलेले पदार्थ खाणं टाळावं. वाढत्या वजनासोबत या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉलही वाढू शकते. हे खाण्याऐवजी झिरो ऑईल पदार्थांचा समावेश आहारात करु शकता तसेच ओव्हन-बेक स्नॅक्स किंवा सूपाचे सेवन करु शकता.
जास्त साखर असणारे गोड पदार्थ
गूळ, गाजराचा हलवा आणि मिठाई हे पदार्थ हिवाळ्यात खास असले तरी त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. जास्त साखरेमुळे वजन वाढण्याचा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो... त्यामुळे कमी साखरेचे पदार्थ तुम्ही आहारात सामाविष्ट करु शकता...
प्रक्रिया केलेले पदार्थ
हिवाळ्यात, खाण्यासाठी तयार अन्न आणि चिप्स आणि इन्स्टंट नूडल्ससारख्या प्रक्रिया केलेल्या वस्तूंचा वापर वाढतो. यामध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज आणि सोडियमचे प्रमाण जास्त असतात, जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे या पदार्थ टाळावे.
उच्च कॅलरी पेय, उच्च चरबीयुक्त डेअरी उत्पादने
चहा आणि कॉफीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील कॅफिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. त्याऐवजी हर्बल टी किंवा ग्रीन टीचे सेवन करा. तसेच तूप, लोणी आणि मलईच्या अतिसेवनाने वजन वाढू शकते. कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ जसे की टोन्ड दूध आणि कमी चरबीयुक्त दही वापरा.
टाळा मिठाचे अन्न
हिवाळ्यात लोणचे,चिप्स यांसारख्या जास्त मिठाच्या पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्याऐवजी फळे आणि सॅलडसारखे हलके स्नॅक्स खायला हवेत.
मोठ्या प्रमाणात खा सुका मेवा
सुका मेवा आरोग्यासाठी फायदेशीर असतो, पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. दररोज मर्यादित प्रमाणात ड्राय फ्रूट्स खा. तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या, हर्बल टी आणि कमी चरबीयुक्त प्रथिने समाविष्ट करा.हिवाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे.












Click it and Unblock the Notifications