ममता कुलकर्णी- बागेश्वरधाम बाबांमध्ये टोकाचा वाद का? नेमकं काय आहे कारण? वाचा...
ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु आठवडाभरातच वाद वाढल्यामुळे अभिनेत्रीकडून हे पद काढून घेण्यात आलं. इतकेच नाही तर ममता कुलकर्णीवर इतरही अनेक आरोप लावण्यात आले. ममताने महामंडलेश्वर पद मिळविण्यासाठी १० कोटी रुपये दिले होते, असा गंभीर आरोप ममतावर करण्यात आला. मात्र ममताने हे सगळे आरोप खोडले असून यावर तिने स्पष्टीकरण दिलं आहे.

ममता कुलकर्णी आली चर्चेत
महाकुंभ दरम्यान ममता कुलकर्णी ही लोकांमध्ये विशेष चर्चेचा विषय बनली आहे. महामंडलेश्वर झाल्यानंतर, अनेक संतांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते, ज्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम यांचाही समावेश होता. तसेच योगगुरू रामदेवबाबा यांनीही ममतावर टीका केली होती. धीरेंद्र शास्त्री यांच्या टीकेचा ममताने चांगलाच समाचार घेतला. एका मुलाखतीमध्ये रामदेव बाबा आणि धीरेंद्र शास्त्रींबाबत ममताला विचारले असता ती म्हणाली की, आता मी यावर काय बोलू शकते. अशा लोकांना महाकाल आणि महाकालीची भीती वाटली पाहिजे अशा शब्दांत तीने रामदेव बाबांना सुनावलं.
धीरेंद्र शास्त्रींची वादात उडी
यासोबतच, धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, धीरेंद्र शास्त्रींच्या वयाएवढी मी तपश्चर्या केली आहे. शास्त्रींचे वय २५ आहे, तेवढी माझी तपश्चर्या आहे. पुढे ममता म्हणाली की मी धीरेंद्र शास्त्रींना फक्त एवढेच सांगू इच्छिते की त्यांच्या गुरूंना दिव्य दृष्टी आहे, त्यांनी त्यांच्या गुरुंना जाऊन मी कोण आहे ते विचारावे आणि शांत बसावे. धीरेंद्र शास्त्री महाकुंभात स्नान करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर होण्यावर आक्षेप घेतला होता. असे पद फक्त खरी श्रद्धा असणाऱ्या आणि निर्मळ मनानेे काम करणाऱ्या व्यक्तीलाच दिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या प्रभावाखाली येऊन कोणीही संत किंवा महामंडलेश्वर कसे बनू शकते? आपण स्वतः अजून महामंडलेश्वर बनू शकलो नाही असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं होत.
पद घेतलं माघारी
या वादाच्या पार्श्वभूमीवर, किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी या दोघांनाही आखाड्यातून काढून टाकले आहे. या आखाड्याच्या संस्थापकांच्या संमतीशिवाय ममताला महामंडलेश्वर पद देण्यात आलं असा आरोप करण्यात आला होता. आता ममताचा महामंडलेश्वर पद काढून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न किन्नर आखाड्याकडून केला जातोय.












Click it and Unblock the Notifications