'माझं करिअर उद्ध्वस्त झालं...' विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपवर मौन सोडलं
Vivek Oberoi Aishwarya Rai Breakup: बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता विवेक ओबेरॉयने आता चित्रपटांवर तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. मात्र याआधीच वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले आणि त्यांला चित्रपट मिळणे बंद झाले.

विवेक ओबेरॉयच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर आजही त्याचे नाव ऐश्वर्या रायसोबत सर्वात जास्त जोडले जाते. त्यांचे नाते कोणापासून लपलेले नव्हते. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान असल्याचं म्हटले जाते. खुद्द विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीदरम्यान ब्रेकअपबद्दल उघडपणे बोलला आहे.
विवेक ओबेरॉयने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले होते. तो म्हणाला, 'माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज लोकांना माझे करिअर बरबाद करायचे होते. त्यानंतर माझा शूटआउट ॲट लोखंडवाला हा चित्रपट आला आणि या चित्रपटातील माझ्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यासाठी मला पुरस्कारही मिळाला. असे असूनही माझ्याकडे काम नव्हते. जवळपास एक ते दीड वर्ष मी घरी बसलो आणि मला कोणत्याही चित्रपटाची ऑफर आली नाही.
जेव्हा विवेक ओबेरॉयला विचारण्यात आले की, ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपमुळे त्याचे करिअर घडले का? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला, 'मला यावर काहीही बोलायला आवडणार नाही. कारण सर्व संपले आहे. पण मी सगळ्यांना सावध करू इच्छितो की तुमच्यात टॅलेंट असेल तर ते दुसऱ्यांमुळे वाया घालवू नका. जर तुमचा पार्टनर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये समस्या निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे. फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने विवेक ओबेरॉयला डेट करायला सुरुवात केली होती. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता, मात्र नंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर 2007 मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. विवेकने 2010 मध्ये प्रियांका अल्वासोबत लग्न केले. आता दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत.












Click it and Unblock the Notifications