Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अनुराग कश्यपने मुंबई सोडली,'बॉलिवूड खूप विषारी झालं आहे', मुंबईतील उद्योगात लोक इतरांना खाली खेचतात

Anurag Kashyap Quits Bollywood: प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी मुंबई सोडल्याचा खुलासा केला आहे. आता दक्षिण भारतात स्वतःसाठी एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मुंबई सोडून जाताना बॉलिवूडवर जोरदार टिका केली आहे. अनुराग कश्यप यांनी बॉलीवूडला 'विषारी' म्हटलं आहे.

अनुराग कश्यप 'द हिंदू'शी बोलताना म्हणाले की, 'मी मुंबई सोडली आहे. मला फिल्मी लोकांपासून दूर राहायचे आहे. हा उद्योग खूप विषारी झाला आहे. प्रत्येकजण अवास्तव लक्ष्यांचा पाठलाग करत आहे. प्रत्येकजण पुढचा 500 किंवा 800 कोटींचा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. क्रिएटिव्ह वातावरण नाहीसे झाले आहे. आधीच मुंबई सोडली आहे, आणि नवीन घराचे भाडेही दिलं आहे. ते कोणत्या शहरात स्थलांतरित झाला आहे हे त्याने उघड केले नसले तरी, काही रिपोर्टनुसार ते बंगळुरूमध्ये शिफ्ट झाल्याची माहिती आहे.

Anurag Kashyap

मुंबईतील उद्योगात लोक इतरांना खाली खेचतात

कश्यपने म्हटलं आहे की हिंदी चित्रपट उद्योग सोडून मुंबईबाहेर जाणारा मी पहिला व्यक्ती नाही. पुढे बोलताना म्हटलं आहे की, "सर्वात जास्त लोक मध्य पूर्वेला, विशेषतः दुबईला पळून शिफ्ट होत आहेत. इतर पोर्तुगाल, लंडन, जर्मनी, अमेरिकेला गेले आहेत. मी मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्मात्यांबद्दल बोलत आहे." मुंबईतील उद्योगात लोक इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई सोडण्याचे आधीचे दिले होते संकेत

मुंबई सोडल्यानंतर आयुष्यात खूप मोठा बद्दल झाला आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत झाली आहे. तसेच कायमचे दारू पिणे देखील सोडले आहे. बॉलिवूडपासून वेगळे झाल्यानंतर कश्यपने दक्षिणेत जाण्याच्या आपल्या प्लॅनबद्दल यापूर्वीच संकेत दिले होते. "मी दक्षिणेकडे जात आहे. मला तिथे जायचे आहे जिथे उत्साह असेल. नाहीतर, मी म्हातारा होऊन मरेन. मी माझ्या स्वतःच्या उद्योगाबद्दल खूप निराश आहे. मला ही मानसिकता आवडत नाही," असे संकेत त्यांनी डिसेंबरमध्ये एका मुलाखतीत दिले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+