शिवरायांच्या काळातील शिक्षा पुन्हा आणण्याची गरज, बदलापूरच्या घटनेवरुन रितेश देशमुख संतापला
Badlapur school girl rape case : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलीवर लैगिंक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत आंदोलकांनी काल रेल रोको आंदोलन केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. या घटनेवर अनेक सेलेब्रिटींनी संताप व्यक्त करत आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही या प्रकरणावर पोस्ट करत संताप व्यक्ता केला आहे.

रितेश देशमुखने आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. "एक पालक म्हणून मी पूर्णपणे दुखावलोय, वैतागलोय आणि चिडलोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वत:च्या घराइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना जी शिक्षा दिली, चौरंग- हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे.", असं ट्वीट करत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
As a parent am absolutely disgusted, pained and raging with anger!!
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 20, 2024
Two 4 year old girls were sexually assaulted by the male cleaning staff member of the school. Schools are supposed to be as safe a place for kids as their own homes. Harshest punishment needs to be given to this…
बदलापुरमधील शाळेत दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी आता न्यायलयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान कालच्या आंदोलनानंतर बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आज शहरात तणावपूर्ण परिस्थिती असली तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आलं आहे. शहरातील व्याप-यांनी आपली दुकानं देखील बंद ठेवली आहेत.












Click it and Unblock the Notifications