Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ITR Filing 2025 : पगारदार ते व्यावसायिक कुणासाठी कोणता आयटीआर फॉर्म योग्य? येथे संपूर्ण माहिती वाचा

ITR Filing 2025 : आयटीआर रिटर्न भरणे हे एक आर्थिक शिस्तीचे लक्षण आहे. सध्या आयटीआर भरण्याचा काळ आहे. या काळात आयटीआर भरण्यासाठी कोणता फाॅर्म असावा, यासंदर्भात अनेकांना माहिती नसते किंवा मनात संम्रभ असतो. जर तुम्ही नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय अथवा, फ्रीलान्सिंगमधून कमाई करत असाल किंवा पेन्शन घेत असाल, प्रत्येक उत्पन्न श्रेणीसाठी वेगवेगळे फॉर्म निश्चित केले आहेत. योग्य फॉर्म निवडणे महत्वाचे आहे. जेणेकरून रिटर्न भरताना कोणतीही चूक होणार नाही आणि भविष्यात नोटीससारख्या समस्या टाळता येतील.

सामान्य उत्पन्नासाठी आयटीआर-१ हा फॉर्म त्या भारतीय रहिवाशांसाठी आहे, ज्यांचे वार्षिक एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये उत्पन्नाचे स्रोत जसे की नोकरी किंवा पेन्शन, एका घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, व्याज किंवा इतर लहान स्रोत यांचा समावेश आहे. कोणत्या वर्गासाठी कोणता आयटीआर फार्म उत्तम आहे हे आपण जाणून घेऊया.

ITR Filing 2025

ITR फॉर्म्स कोणासाठी कोणता फॉर्म योग्य आहे?

ITR-1

हा फॉर्म पगारदार व्यक्ती आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आहे.

उत्पन्न मर्यादा: ₹50 लाखांपर्यंत.

उत्पन्नाचे स्रोत: पगार किंवा निवृत्ती वेतन, एका घर मालमत्तेतून मिळणारे भाडे, आणि इतर छोटे उत्पन्न (उदा. बचत खात्यावरील व्याज). हा फॉर्म फक्त भारतीय रहिवाशांसाठी आहे.

ITR-2

हा फॉर्म अशा व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी आहे, ज्यांचे उत्पन्न व्यवसायातून किंवा पेशातून नाही.

उत्पन्नाचे स्रोत: पगार, एकापेक्षा जास्त घर मालमत्ता, भांडवली नफा (Capital Gains), आणि इतर स्रोत. या फॉर्मचा वापर करण्यासाठी व्यवसायाचे उत्पन्न नसावे.

ITR-3

हा फॉर्म व्यवसाय किंवा पेशातून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती आणि एकत्रित कुटुंबासाठी आहे.

उत्पन्नाचे स्रोत: व्यवसाय किंवा पेशातून मिळणारे उत्पन्न, पगार, घर मालमत्तेतून मिळणारे भाडे आणि इतर स्रोत. हा फॉर्म व्यवसाय आणि पेशा दोन्हीमधून उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी आहे.

ITR-4

हा फॉर्म छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आहे, जे अनुमानित कर योजनेचा (Presumptive Taxation Scheme) लाभ घेतात.

उत्पन्न मर्यादा: ₹50 लाखांपर्यंत.

कोणासाठी: व्यक्ती, HUF आणि भागीदारी संस्था (LLPs वगळता).

महत्वाचे: यामध्ये कलम 44AD, 44ADA, किंवा 44AE अंतर्गत कर भरणाऱ्यांचा समावेश होतो.

ITR-5

हा फॉर्म विशिष्ट संस्थांसाठी आहे. उदा. कंपन्या, व्यक्ती, HUF किंवा ITR-7 दाखल न करणाऱ्या संस्था. यामध्ये भागीदारी संस्था (Partnership Firms), LLP, AOP आणि BOI यांचा समावेश होतो.

ITR-6

हा फॉर्म कंपन्यांसाठी आहे. यामध्ये ज्या कंपन्या आयकर कायद्याच्या कलम 11 अंतर्गत सूटचा दावा करत नाहीत.

ITR-7

हा फॉर्म राजकीय, धार्मिक आणि विश्वस्त संस्थांसाठी आहे. यामध्ये ज्या संस्थांना कलम 139(4A), 139(4B), 139(4C) किंवा 139(4D) अंतर्गत रिटर्न भरणे आवश्यक आहे. यामध्ये राजकीय पक्ष, धार्मिक विश्वस्त आणि धर्मादाय संस्थांचा समावेश होतो.

ITR-U

हा फॉर्म जुन्या रिटर्नमध्ये सुधारणा करण्यासाठी आहे. पण एक प्रश्न पडतो की, तो कधी वापरावा हे सांगायचे झाल्यास जर तुम्ही जुन्या आर्थिक वर्षासाठी भरलेल्या रिटर्नमध्ये काही चूक झाली असेल आणि ती दुरुस्त करायची असेल ते व्हा वापरावा.

मुदत: हा फॉर्म 48 महिन्यांपर्यंत लागू असतो.

(टिप: तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार आणि श्रेणीनुसार योग्य फॉर्मची निवड करणे आवश्यक आहे. चुकीचा फॉर्म निवडल्यास तुमचा रिटर्न नाकारला जाऊ शकतो. गरज पडल्यास, तुम्ही कर सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता.)

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+