का साजरी करतात गुरुपोर्णिमा, आपल्या जीवनात गुरुचे स्थान एवढे मोठे का? घ्या जाणून
गुरु आणि शिष्य ही भारतात पुर्वापार चालत आलेली परंपरा. या परंपरेत अनेक महापुरुष, संतमहात्मे होते. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातही गुरुचे मोठे स्थान आहे. त्याआधी आणि आजपर्यंत हे स्थान अबाधित आहे. आजही आपण आपल्या शिक्षकाप्रती आदर व्यक्त करीत आपण त्यांना गुरु मानतो.
आपण कुणाला ना कुणाला गुरु मानतोच ही बाब प्रत्येकांच्या जीवनात येते. आपल्या आध्यात्मिक किंवा शैक्षणिक गुरूंचा सन्मान करण्यासाठी, त्यांची उपासना करण्यासाठी आणि त्यांचा आदर करण्यासाठी साजरा केला जाणारा सण आहे.

जीवनात गुरुची भूमिका महत्त्वाची
विद्या ग्रहन करणे हे शिष्याचे काम तर निस्वार्थपणे ज्ञान देणे हे गुरुचे काम या परंपरेला आपल्या इतिहासातही अढळस्थान आहे. एकलव्यानेही अप्रत्यक्ष गुरु केला होता. त्यातून तो इतिहासात अजरामर झाला. न भेटताही गुरु मानने आणि कर्म करीत राहणे यातही फलश्रृती मिळतेच.
संत परंपरेत गुरुला मोठे स्थान
बाराव्या शतकातही कर्नाटकातील महान विभुती महात्मा बसवेश्वर आणि महाराष्ट्रातील महान संत ज्ञानेश्वरांनीही गुरुची महती सांगितली आहे. ज्ञानेश्वरांनी तर त्यांचे मोठे बंधू सोपानदेव यांना गुरु मानले. आपल्या संतांनी गुरुपरंपरा केवळ सांगितलीच नाही तर ती जपलीही. त्यामुळे आपल्याकडे हा पारंपारिक आणि अध्यात्मिक ठेवाही आहे. त्यामुळेच आपण घडतो. त्यानंतर वारकरी संप्रदायापासून ते सर्वच संतपरंपरेत गुरुला महत्व दिले गेले.
सचिन तेंडूलकर सारख्या विख्यात खेळाडूचेही गुरु रमाकांत आचरेकर हे होते. ही परंपरा कित्येक पिढ्यांपासून चालत आली असून ती पुढे चालतच जाणार आहे.
का साजरी करतात गुरुपोर्णिमा?
पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा महाभारताचे लेखक वेद व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो. त्यांच्या सन्मानार्थ या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी चार वेदांची रचना केली होती आणि त्यामुळेच त्यांना वेद व्यास असे नाव पडले, असेही शास्त्रात सांगितले आहे.
हिंदू पौराणिक कथेनुसार, हा दिवस ऋषी व्यास, ऋषी पराशर यांचे पुत्र यांचा जन्म आहे . असे मानले जाते की त्याच्याकडे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील सखोल ज्ञान होते. महर्षि व्यास यांची आठवण आणि गुरुला वंदन करण्यासाठी, शिष्याकडून गुरुचे आभार मान्यासाठी हा दिवस साजरा करतात.
बौद्ध परंपरेतील गुरू पौर्णिमा
आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धाने सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले. तो दिवस गुरू पौर्णिमेचा होता असे मानले जाते त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवसाला विशेष महत्व आहे.
शिक्षकाबद्दल व्यक्त करतात कृतज्ञता
हा हिंदू कॅलेंडरच्या आषाढ शुक्ल पौर्णिमेला (पौर्णिमेचा दिवस) साजरा केला जातो. या दिवशी, शिष्य पूजा (पूजा) करून किंवा त्यांच्या गुरुंना आदर देऊन त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात . हा सण साधारणपणे जून किंवा जुलै महिन्यात येतो. यंदा तो आज २१ जुलैला आहे. आजही महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत आणि कुटुंबात हा दिवस साजरा करतात.
गुरु श्रेष्ठ का?
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
- गुरुला ब्रम्हा, विष्णू आणि महादेव हेच साक्षात गुरुरुप आहेत. जोपर्यंत गुरुची कृपा प्राप्त होत नाही, तोपर्यंत कोणतीही व्यक्ती अज्ञानाच्या अंधारात भरकटत राहते आणि भ्रम आणि माया यांच्या बंधनात जखडून राहते आणि मोक्ष प्राप्त होत नाही.
- गुरूशिवाय त्याला सत्य-असत्य यातील फरक कळत नाही, योग्य-अयोग्य काय हे कळत नाही. गुरुंप्रती कृतज्ञतेची भावना जपली पाहिजे, असा विश्वास आहे आणि तो व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
- गुरुपौर्णिमेचा सण केवळ भारतातच नाही तर नेपाळ आणि भूतानमध्येही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications