ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ आपले सर्व सामने कोठे खेळणार? पाकिस्तानने केलं स्पष्ट
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कुठे होणार, भारत खेळणार का, पाकिस्तानची भुमिका काय, भारताची भुमिका काय या सर्व गोष्टींवर पडदा पडला. त्यानंतर हायब्रीड माॅडेलवर हे सामने खेळले जाईल अशी चर्चाही झाली. नंतर आयसीसीने आपला निर्णय जाहीरही केला. आता या ट्राॅफीसंदर्भात एक मोठी बातमी येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील, असे आयसीसीने आधीच जाहीर केले होते. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) तटस्थ ठिकाण निवडण्याची संधी देण्यात आली.

PCB ने तटस्थ ठिकाण घोषित केले
आता PCB ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध दुबई येथे सामना खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर PCB ने हा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दुबईला तटस्थ ठिकाण म्हणून निवडण्यात आले आहे.
हेही वाचा : 2024 मध्ये T-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने केला कहर; केव्हा कशी मारली बाजी, घ्या जाणून
पीसीबीने घेतली बैठक
21 डिसेंबर रोजी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी अमीरात क्रिकेट बोर्ड (ECB) चे प्रमुख शेख नह्यान बिन मुबारक अल नाहयान यांच्याशी बैठक घेतली. वृत्तानुसार, सीबीचे प्रवक्ते आमिर मीर यांनी एका प्रकाशनात सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि अमिराती क्रिकेट बोर्ड (ईसीबी) चे अध्यक्ष शेख मुबारक अल नाहयान यांच्यात रविवारी झालेल्या बैठकीनंतर, आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आगामी सामन्यांसाठी दुबईला तटस्थ ठिकाण म्हणून निवडण्यात आले आहे.
हेही वाचा : भारत-पाकिस्तान हायहोल्टेज ड्राम्याची तारीख ठरली; हायब्रिड माँडेलमध्ये असे रंगणार सामने
भारत अंतीम, उपांत्य फेरीत पोहचला तर काय?
यासोबतच जर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत पोहोचला तर हे सामनेही दुबईतच होतील. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलेले नाही, त्यामुळे त्याच्या तारखा आणि वेळा निश्चित होणे बाकी आहे.
हेही वाचा : मोठी बातमी..! चॅम्पियन ट्राँफीचे हायब्रीड माँडेल ICC ने स्विकारले, वर्ल्डकपच्या सामन्यांबाबतही घोषणा












Click it and Unblock the Notifications