भारत-पाकिस्तान हायहोल्टेज ड्राम्याची तारीख ठरली; हायब्रिड माँडेलमध्ये असे रंगणार सामने
चॅम्पियन्स ट्रॉफी- 2025 ची तारीख आणि वेळ आता ठरली आहे. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने हे हायब्रिड माँडेलमध्ये होईल, हे आयसीसीने स्पष्ट केले होते. दरम्यान, भारत-पाकिस्तानचे सामने कधी होतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

आयसीसीने दिले हायब्रिड माँडेल
भारत व पाकिस्तान या दोन्ही देशातील क्रिकेट सामने हे हायहोल्टेज असतात. या दोन्ही देशांतील क्रिडा रसिकच नाही, तर संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष असते. मात्र आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी- 2025 या स्पर्धेचे यजमान पद पाकिस्तानकडे असल्याने भारत या स्पर्धेसाठी जाणार की नाही, यावर चर्चा रंगल्या होत्या. भारताने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार कळविल्यानंतर या दोन्ही देशांनी त्रयस्थ ठिकाणी सामने खेळण्याची परवानगी आयसीसीकडे मागितली होती. दोन दिवसांपूर्वी आयसीसीने या स्पर्धेच्या हायब्रिड माँडेलला परवानगी दिली.
भारत-पाक एकाच गटांत
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचा प्रारूप आराखडा आयसीसीकडे पाठवला होता. त्यात भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून सामना 1 मार्चला होईल असं सांगण्यात आलं होतं. पण आता यात बदल झाला आहे. हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा होणार असल्याने भारताचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत. हे सामने कोलंबो किंवा दुबईत होण्याची शक्यता आहे. भारत- पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. जवळपास या तारखेवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे.
१९ फेब्रुवारीपासून रंगणार थरार
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तानमधील तीन स्टेडियममध्ये होणार आहे. रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे हे सामने होतील. तर हायब्रिड मॉडेलनुसार भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळेल. भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय सामने खेळत नाहीत. दोन्ही संघ शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-2013 मध्ये खेळले होते. भारत-पाकिस्तान सामने आता फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये होतात. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आठ संघांचा समावेश आहे. श्रीलंकेचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पात्र ठरले आहेत.












Click it and Unblock the Notifications