Champions trophy 2025 : अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आजचा सामना कोणी जिंकला? वाचा
Champions trophy 2025 Afghanistan vs south Africa : दक्षिण आफ्रिका संघाने अफगाणिस्तानविरुद्ध 107 धावांनी विजय मिळवला आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीची शानदार सुरुवात केली आहे. हा सामना आफ्रीकन संघाने खिशात घातला आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिकेल्टनला शतक झळकावण्यात यश आले. त्याने दमदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. दक्षिण आफ्रिकेने 315 धावा केल्या.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 107 धावांनी पराभव केला.

तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी नाणेफेक जिंकल्यानंतर कराचीतील नॅशनल स्टेडियमवर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने 6 गडी गमावून 315 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान 43.3 षटकांत 208 धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यात आफ्रिकन संघाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. कर्णधार टेम्बा बावुमा, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्कराम यांनी संघासाठी पन्नासहून अधिक धावांची खेळी खेळली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 315 धावा करू शकला.
रायन रिकेल्टन सामनावीर
दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकेल्टनने शतक झळकावले. तो सामनावीरही ठरला. एडन मार्करामने 52, टेम्बा बावुमाने 58 आणि रॅसी व्हॅन डर डुसेनने 52 धावा केल्या. कागिसो रबाडाने ३ बळी घेतले. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने 91 धावा केल्या. मोहम्मद नबीने 2 बळी घेतले.
अफगाणिस्तान 208 धावांवर ऑलआऊट
44 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कागिसो रबाडाने रहमत शाहला झेलबाद केले. रहमत 90 धावा करून बाद झाला, यामुळे अफगाणिस्तानचा संघ 208 धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 107 धावांनी जिंकला.
'या' खेळाडूंनी आपली जादू दाखवली
एडन मार्कराम आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी शेवटच्या षटकांमध्ये वेगवान धावा काढल्या. मात्र, नूर अहमदने रॅसी व्हॅन डर डुसेनला आपला शिकार बनवले. तो 46 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, रायन रिकेल्टनने 101 चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. मात्र, शतक झळकावल्यानंतर तो राशिद खानच्या षटकात धावबाद झाला.
हेही वाचा : Champion Trophy 2025 : आश्चर्यच.. चॅम्पियन ट्राॅफीत खेळत आहेत 18 भारतीय खेळाडू! 3 पाकिस्तानात खेळणार
अफगणिस्तानची खराब सुरुवात
50 धावांच्या आत 4 गडी गमावून 316 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. रहमानउल्ला गुरबाज लवकरच आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. रहमानउल्ला गुरबाजनंतर इब्राहिम झद्रान, सेदिकुल्लाह अटल आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनेही 50 धावांच्या आत विकेट गमावल्या. कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीच्या धारदार गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचे फलंदाज हतबल दिसत होते.
हेही वाचा : SSC Board Exam 2025 : दहावीचा पेपर फुटलाच नाही..! काय म्हणाले जिल्हाधिकारी? वाचा सत्य
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Afghanistan vs south Africa अफगाणिस्तान संघ : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जद्रान, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, फजलहक फारुकी, नूर अहमद.
Afghanistan vs south Africa : दक्षिण आफ्रिका: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टोनी डी जॉर्जी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड महाराज केन, मार्क्स केन, मार्क्स केन, मार्क्सन, एम गिसो रबाडा, लुंगी एनगिडी
हेही वाचा : Champions Trophy 2025 : करा किंवा मरा..,ही चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित-कोहलीसाठी अग्निपरीक्षा, अन्यथा...












Click it and Unblock the Notifications