Champion Trophy 2025 : आश्चर्यच.. चॅम्पियन ट्राॅफीत खेळत आहेत 18 भारतीय खेळाडू! 3 पाकिस्तानात खेळणार
Champion Trophy 2025 : चॅम्पिय ट्राफी 2025 ला सुरुवात झाली असून भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धचा आपला पहिला सामना अपेक्षेप्रमाणे जिंकला आहे. पण या स्पर्धेत टीम इंडियाचे 15 नव्हे तर 18 खेळाडू खेळत आहेत यातील 3 खेळाडू पाकिस्तानात खेळताना दिसणार आहेत..! आता तुम्ही म्हणाल की, हा काय विनोद पण ही गोष्ट तुम्हाला समजून सांगणार आहोत, चला जाणून घेऊया नेमके प्रकरण काय आहे..
भारताने आपल्या पहिल्या वहिल्या सामन्यात विजयी पताका लगावली आहे. विजयाचा श्रीगणेशा करत या स्पर्धेत भारताने आपले इरादे किती पक्के आहेत हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारतीय संघ इथेच थांबणार नसून विजयाच्या जिद्दीने खेळत आहे.

मुळातः भारतीय क्रिकेट संघ 15 सदस्यीय आहे, पण जेव्हा टुर्नामेंट सुरु झाले असून आता 18 खेळाडू झाले आहेत. तसे पाहिल्यास भारताशिवाय सात पैकी तीन संघ असे आहेत की, त्यांच्यातील एक-एक खेळाडूचा संबंध भारताशी आहे. न्युझीलंड, आस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातील प्रत्येकी एक खेळाडू मुळ भारतीय आहेत. काही वर्षांपुर्वी त्यांचे पुर्वज संबंधित देशात वास्तव्यास गेले होते.
हे आहेत 'ते' 3 खेळाडू
रचिन रविंद्र
रचिन रविंद्र हा मुळ भारतीय असला तरी न्युझीलंड संघाचा स्टार खेळाडू आहे. तो अष्टपैलू असून त्याचे आजोबा-आजी बंगळुरूत राहतात. रचिनचे वडील रवि कृष्णमुर्ती न्युझीलंडमध्ये वास्तव्यास आहेत. ते स्वःत क्रिकेटर होते हा वारसा रचिन पुढे नेत आहे. रचिनने 29 सामन्यात 970 धावा केल्या आहेत.
तनवीर संघा
तनवीर संघा हा आस्ट्रेलिया संघात आहे. पंधरा जणांच्या संघात त्याला स्थान मिळालेले आहे. तो मुळ भारतीय आहे. त्याचे वडील पंजाबच्या जालंधर येथील आहे. 1997 साली भारत सोडून आस्ट्रेलियात त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले आहे. आता त्यांचा मुलगा तनवीर आस्ट्रेलियन संघात सध्या नाव कमवत आहे.
केशव महाराज
दक्षिण आफ्रिकेच्या संघात केशव महाराज हे नाव आता मोठे झालेले आहे. गोलंदाज आणि फलंदाज असलेला केशव महाराज याने भारताविरुद्ध या आधी सामने खेळलेले आहेत. तो एक फिरकी गोलंदाज असून केशव महाराजचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील डरबन शहरात 7 फेब्रुवारी 1990 साली झाला आहे. त्याचे पुर्वज भारतीय असून सुल्तानपूर येथील ते आहेत. 1874 साली त्याचे पुर्वज भारतातून दक्षिण आफ्रिकेत गेले होते. केशव महाराज याने 45 वनडे सामन्यात 55 विकेट्स घेतलेल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications