बंगळुरू स्टेडीयममधील चेंगराचेंगरीला RCB जबाबदार! IPS अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, कॅटचा निर्णय
Bengaluru stadium stampede update : बंगळुरू येथे आयपीएलचा शेवटचा सामना आणि आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद राॅयल चॅलेंजर बंगळुरू म्हणजेच आरसीबीने जिंकले. यानंतर या विजयानिमित्त 4 मे 2025 रोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये आयोजित कार्यक्रमावेळी एकच गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा नाहक बळी गेला. या प्रकरणात आता कॅटने महत्वपूर्ण निर्णय दिला असून या चेंगराचेंगरीला आरसीबी जबाबदार असल्याचा निर्णय दिला आहे.
कॅट अर्थात केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने यासंदर्भात दिलेल्या निर्णयात कर्नाटक सरकारने निलंबित केलेल्या सर्व सनदी अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेशही दिला आहे.

पोलिस जादूगार नाहीत..!
एबीपी माझ्याच्या वृत्तानुसार, कॅटने बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात निर्णय देताना टिप्पणी केली. यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करत त्यांनी म्हटले की, एवढ्या कमी वेळात गर्दी कमी करायला पोलिस जादुगार नाहीत. त्यांच्याकडे अल्लाऊद्दीनचा चिराग नाही एकाअर्थी पोलिसांना या प्रकरणात कॅटने क्लिन चीट दिल्याचे समोर येत आहे.
कशी आणि कधी घडली होती चेंगराचेंगरीची घटना?
4 मे 2025 रोजी बंगळुरू येथे आरसीबीने आयपीएल ट्राॅफी जिंकल्याबद्दल एक कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी स्टेडीयमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि 11 लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
आयपीएस अधिकाऱ्यांना केले होते निलंबित
बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगर प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी बंगळुर पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. या निलंबनाविरोधात आयपीएस अधिकारी विकास कुमार यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती, त्यानंतर या प्रकरणात सर्व बाजू ऐकल्यानंतर कॅटने निर्णय दिला.
आरसीबी चेंगराचेंगरीला जबादार - कॅट
कॅटने आरसीबीवर ठपका ठेवला आहे. चेंगराचेंगरीला प्रथमदर्शनी आरसीबीला जबाबदार ठरवले आणि नमूद केले की, आरसीबीने सोशल मीडियावर विजयी मिरवणुकीचे निमंत्रण पोस्ट केली होती. त्यामुळे मोठी गर्दी जमली,या एवढ्या कमी वेळेत पोलिसांकडून योग्य व्यवस्था करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. तसेच आरसीबीने पुर्व परवानगीही घेतली नाही असे म्हटले आहे. तसेच आयपीएस अधिकारी विकास कुमार यांचे निलंबन रद्द केले.
हेही वाचा : चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरण, न्यायालयाचा मोठा निर्णय; RCBच्या मार्केटिंग प्रमुखाला अटक
हेही वाचा : चॅम्पियन होऊनही, आरसीबी 'या' 5 खेळाडूंना IPL 2026 पुर्वी घरचा रस्ता दाखवणार! काय आहे कारण? वाचा
हेही वाचा : आयपीएल- २०२५ पूर्वी बीसीसीआयने जाहीर केले नवे नियम; सीएसके, एमआय, आरसीबी फटका बसण्याची शक्यता












Click it and Unblock the Notifications