चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरण, न्यायालयाचा मोठा निर्णय; RCBच्या मार्केटिंग प्रमुखाला अटक
Chinnaswamy Stadium stampede incident, RCB : बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसले यांना 6 जून रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर हा खटला कर्नाटक उच्च न्यायालयात होता, ज्यावर आज निर्णय आला आहे.

उच्च न्यायालयाने 11 जून रोजी सुनावणी पूर्ण केल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. आज या खटल्याचा निर्णय दिला आहे. त्यांना दिलासा देत, त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. परंतु ते बाहेर जाऊ शकत नाहीत. सोसले यांना त्यांचा पासपोर्ट परत करण्यास सांगण्यात आले आहेत.
6 जून रोजी सोसले यांना अटक
अपघाताच्या दोन दिवसांनी, शुक्रवारी, 6 जून रोजी सकाळी सोसले यांना केंद्रीय गुन्हे शाखेने विमानतळावरून ताब्यात घेतले. त्याच दिवशी त्यांच्या वकिलाने कर्नाटक उच्च न्यायालयात अटकेच्या वैधतेला आव्हान दिले, परंतु या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
एफआयआरनुसार, स्टेडियममध्ये लाखो लोक जमले होते आणि आयोजकांकडून गोंधळ उडाला होता. स्पष्ट नियोजनाअभावी गर्दी अनियंत्रित झाली. त्यानंतर ही घटना घडली. एफआयआरमध्ये मोठ्या संख्येने लोक जमलेल्या गेट नंबरचा उल्लेख आहे.












Click it and Unblock the Notifications