चॅम्पियन होऊनही, आरसीबी 'या' 5 खेळाडूंना IPL 2026 पुर्वी घरचा रस्ता दाखवणार! काय आहे कारण? वाचा
Despite becoming the champion RCB will release 5 players : आयपीएल 2025 चा किताब जिंकून आरसीबीने आपल्या नावावर आयपीएल ट्राॅफी केली आहे. 3 जून रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव करून राॅयल चॅलेंजर बंगळुरूने प्रथमच आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
आरसीबीसाठी हा हंगाम आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम राहिला आहे. आता शानदार कामगिरी केल्यानंतरही या संघातील पाच खेळाडूंना आयपीएल 2026 च्या स्पर्धेत संघाबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते अशी शक्यता आहे.

आरसीबी आयपीएल 2026 पूर्वी मोठा निर्णय घेईल का?
आयपीएल लिलावापुर्वी 2026 पूर्वी, आरसीबी काही खेळाडूंना रिलीज करू शकते, जेणेकरून संघ अधिक मजबूत होईल. आता पाच खेळाडूंना रिलिज करण्याची चर्चा रंगत आहे. आपण त्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांची जागा आरसीबी नवीन खेळाडूंना देऊ शकते.
1. मयांक अग्रवालला राहू शकतो संघाबाहेर
आरसीबीचा महत्वाचा खेळाडू असलेला मयांक अग्रवाल याचा देवदत्त पडिक्कलच्या दुखापतीमुळे संघात समावेश करण्यात आला होता. जरी त्याने एलएसजीविरुद्धच्या महत्त्वाच्या खेळीसारखी चांगली कामगिरी केली असली तरी, बरे झाल्यानंतर पडिक्कल परतल्यानंतर, मयंकची संघात गरज कमी होईल. त्यामुळे, त्याला रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.
2. मोहित राठी
आरसीबीतून बाहेर जाण्याच्या यादीत मोहित राठी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोहितला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी करण्यात आले होते, परंतु या हंगामात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. त्याच्याऐवजी संघ व्यवस्थापन एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूचा शोध घेऊ शकते.
3. लुंगी न्गिडी
आरसीबी संघ व्यवस्थापनाने लुंगी न्गिडीला 1 कोटी रुपयांना खरेदी केले, पण तो फारशी प्रभावी कामगिरी करु शकला नाही. त्याने फक्त दोन सामने खेळले आणि सरासरी कामगिरी केली, त्याची कामगिरी संघात कायम राहील अशी फार चमकदार नाही.
4. अभिनंदन सिंग
या हंगामात अभिनंदन सिंग आरसीबीच्या मुख्य संघात स्थान मिळवू शकला नाही. बॅकअप पर्याय असल्याने, संघ व्यवस्थापनाला त्याची कमी गरज वाटली. जर चांगला पर्याय सापडला तर त्याला सोडले जाऊ शकते.
5. लियाम लिव्हिंगस्टोन
लियाम लिव्हिंगस्टोनबद्दल बोलायचे झाले तर, त्याला मोठ्या रकमेत म्हणजेच 8.75 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले, मात्र तो फारशी चमकादार कामगिरी करु शकला नाही अशा स्थितीत तो आयपीएल 2026 पुर्वी संघाबाहेर राहू शकतो.












Click it and Unblock the Notifications