Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टीम इंडियात मोठे बदल! यांची सुट्टी, BCCI करणार नवी पदभरती, रोहीत-विराटच्या काँट्रॅक्टचे काय? वाचा

BCCI's new recruitment for women's team : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने महिला संघासाठी दोन महत्त्वाच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. पहिली पोस्ट हेड फिजिओथेरपिस्टसाठी आणि दुसरी पोस्ट स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोचसाठी आहे. या दोन्ही पदांसाठी इच्छूक आणि पात्र व्यक्तीला अर्ज करण्याची संधी आहे.

BCCI s new recruitment for women s team

बोर्डाने बुधवारी रिक्त पदांची माहिती दिली आहे. रिक्त पदासोबतच बीसीसीआयने आवश्यक पात्रता आणि अनुभवाचाही उल्लेख केला आहे. बीसीसीआयने महिला संघासाठी मुख्य फिजिओथेरपिस्ट आणि स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकपदासाठी भरती सुरु केली आहे. त्यामुळे महिला संघासाठी या पदावर काम करणाऱ्यांची सुट्टी निश्चित मानली जात आहे. नवीन स्ट्रेंथ कंडिशनिंग कोच आणि फिजिओथेरपिस्ट यांना बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये काम करावे लागेल.

फिजिओसाठी पात्रता काय आहेत?

  • स्पोर्ट्स या मस्कुलोस्केलेटल फिजियोथेरेपी/स्पोर्ट्स एंड एक्सरसाइज मेडिसिन/स्पोर्ट्स रिहैबिलिटेशन तज्ज्ञ तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक आहे.
  • यासोबतच फिजिओथेरपीचा किमान 10 वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या फिजिओला संघ किंवा खेळाडूसोबत काम करण्याचा अनुभव असावा.
  • फिजिओ हा संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि विशेषत: खेळाडूंचे फिटनेस वेळापत्रक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक पात्रता

स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. यासोबतच एखाद्या संघात किंवा खेळाडूसोबत काम करण्याचा अनुभवही असायला हवा.

BCCI चे काँट्रॅक्ट लांबणीवर

बीसीसीआयने पुरुष संघाच्या करारावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सांगण्यात येते की, हा करार आक्टोबर 2025 च्या आत पुर्ण होऊ शकतो. हा करार जरी लांबणीवर पडला तरीही चर्चा याचीच आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे काय होणार?

रोहीत-विराटला पुन्हा सर्वाधिक पैसे मिळतील का?

रोहीत आणि विराट सध्या आयपीएल स्पर्धेत खेळत आहेत. यानंतर त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होईल आणि पुढील 6 महिने दोघांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. या पुढील 6 महिन्यांत रोहित आणि विराटला बीसीसीआयकडून जास्तीत जास्त पैसे मिळतील की नाही हे कळेल.

हेही वाचा : IPL 2025 : बुमराह आणि रोहित काय करणार; MI हैदराबादचा सामना करू शकेल का?, जाणून घ्या- मागील रेकॉर्ड

हेही वाचा : IPL सामन्यावर 'फिक्सिंग'चे ढग! खेळाडूंना आमिष दाखवण्याचे प्रयत्न, जे हे सर्व करतेय? 'ती' व्यक्ती कोण

हेही वाचा : IPL 2025 Points Table: कोणता संघ टॉपवर ? कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट, ऑरेंज, पर्पल कॅप कोणाकडे ?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+