Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL सामन्यावर 'फिक्सिंग'चे ढग! खेळाडूंना आमिष दाखवण्याचे प्रयत्न, जे हे सर्व करतेय? 'ती' व्यक्ती कोण

IPL 2025 : क्रिकेट आणि सट्टा ही नवी गोष्ट नाही पण क्रिकेट आणि मॅच फिक्सिंग अर्थात सामना निकाल निश्चिती हा क्रिकेटसाठी मोठा शाप आहे. क्रिकेटच्या इतिहासात मॅच फिक्सिंग अनेकदा झाली. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हन्सी क्रोनिए पासून तर काही भारतीय खेळाडूंचीही नावे चर्चेत आली होती. आता IPL 2025 मध्ये मॅच फिक्सिंगचा धोका असल्याचे बोलले जात आहे.

जगात बीसीसीआय सर्वात श्रीमंत आहे आणि भारतात क्रिकेट खेळाडूंना अक्षरशः डोक्यावर घेतले जाते अशातच आयपीएल हा भारतातील आणि जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा मानली जाते जी दीर्घ कालावधीची आहे. या आयपीएल स्पर्धेत सामना निकाल निश्चितीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

IPL 2025

मॅच फिक्सिंगसाठी प्रयत्न

टीव्ही-9, भारतवर्षच्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये खेळाडूंना फिक्सिंगसाठी आमिष दिले जात आहे तसे अनेक प्रयत्न केले जात आहेत असा BCCI च्या अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिट (ACSU) ने लीगच्या सर्व 10 संघांना आधीच इशारा दिला आहे.

Take a Poll

कोण करतेय हे सर्व?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलचा 18वा सीझन फिक्स करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. BCCI च्या अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिट (ACSU) ने लीगच्या सर्व 10 संघांना आधीच इशारा दिला आहे. कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ कळवा, असा इशारा त्यांनी दिला आहे. ACSU च्या मते, फिक्सिंगचे ढग सध्या स्पर्धेवर आहे. यासाठी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, संघमालक, समालोचक यांच्या कुटुंबीयांना चाहत्यांच्या रुपात दाखवून त्यांना महागड्या भेटवस्तू देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सूत्रधार कोण?

अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिटला वाटते की, हैदराबाद-आधारित व्यावसायिक स्पर्धेत सहभागी असलेल्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा खुलासा अद्याप झाला नाही पण या व्यावसायिकाचे सट्टेबाजांशी थेट संबंध असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही तो अशा भ्रष्ट कारवायांमध्ये सहभागी होता. त्याचा जुना रेकॉर्ड आहे. त्यामुळे ACSU ने संघांना इशारा दिला आहे.

ACSU चे आवाहन

संबंधित व्यावसायिकाने कोणत्याही प्रकारे संघ, संघातील खेळाडू आणि इतरांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ कळवावे, असे आवाहन ACSU कडून करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, हा व्यावसायिक स्वत:ला फॅन सांगून खेळाडू सांगतो आणि प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि फ्रँचायझी मालकांच्या जवळ जाऊन आपले इप्तित साध्य करतो. संघातील सदस्य , त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटवस्तू देत असल्याची माहिती समोर येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+