IPL 2025 Points Table: कोणता संघ टॉपवर ? कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट, ऑरेंज, पर्पल कॅप कोणाकडे ?
IPL 2025 Points Table: पंजाब किंग्जने ((PBKS) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंखा करून सामना जिंकला आहे. मंगळवार 15 एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा 16 धावांनी पराभव केला आणि 111 धावांच्या छोट्या धावसंख्येचेही विजयात रूपांतर केलं आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरच्या पराभवामुळे पॉइंट्स टेबलचे चित्र बदललं आहे. पंजाब आता टॉप-4 मध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे तर केकेआरचा संघ सहाव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स (GT) अजूनही अव्वल स्थानावर आहे, परंतु दिल्ली, बंगळुरू आणि आता पंजाबच्या दमदार पुनरागमनामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रोमांचक झाली आहे. केकेआरसाठी आता धोक्याची घंटा आहे का? ते पाहणे मनोरंजक असेल. चला लेटेस्ट पॉइंट्स टेबलवर एक नजर टाकूया.

1. गुजरात टायटन्स (GT) - 6 सामने, 4 विजय, NRR +1.081
सलग चार विजयांनंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण तरीही ते अव्वल स्थानावर आहेत. गुजरात टायटन्सने संतुलित संघ आणि उत्कृष्ट कामगिरीसह आघाडी घेतली आहे.
2. दिल्ली कॅपिटल्स (DC)- 5 सामने, 4 विजय, एनआरआर +0.899
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्लीने पहिले चार सामने जिंकून आघाडी मिळवली आहे. एका सामन्यात पराभव झाला आहे, पण संघ मजबूत स्थिती दिसतोय.
3. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCB)- 6 सामने, 4 विजय, एनआरआर +0.672
चढ-उतार असूनही रजत पाटीदारच्या संघाने चार विजय मिळवले आहेत. गोलंदाजीत सुधारणा आवश्यक आहे, पण फलंदाजी मजबूत आहे.
4. पंजाब किंग्ज (PBKS)- 6 सामने, 4 विजय, एनआरआर +0.172
केकेआरवर मोठा विजय मिळवून पंजाबने प्लेऑफच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. श्रेयस अय्यरच्या संघाने प्रत्येक सामन्यात लढाऊ कामगिरी दाखवली आहे.
5. लखनऊ सुपरजायंट्स (LSG) - 7 सामने, 4 विजय, एनआरआर +0.086
सलग तीन विजयांनंतर ऋषभ पंतच्या संघाला शेवटचा सामना गमवावा लागला. संघात टॅंलेट आहे, पण मधल्या डावात गती राखणे हे एक आव्हान आहे.
6. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)- 7 सामने, 3 विजय, एनआरआर +0.547
पंजाबविरुद्धच्या पराभवामुळे टॉप-4 च्या शर्यतीला मोठा धक्का बसला. पॉवरप्लेमध्ये विकेट गमावणे आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणे हे चिंतेचे कारण बनत आहे.
7. मुंबई इंडियन्स (MI)- 6 सामने, 2 विजय, एनआरआर +0.104
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघात समन्वय दिसून येत आहे. वरच्या फळीतील खेळाडू धावा काढत आहेत, पण गोलंदाजी अजूनही कमकुवत असल्याचे सिद्ध होत आहे.
8. राजस्थान रॉयल्स (RR)- 6 सामने, 2 विजय, एनआरआर -0.838
सुरुवातीच्या लयीनंतर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ डळमळीत झाला आहे. फिनिशिंग आणि बॉलिंग लाइनअपवर काम करण्याची गरज आहे.
9. सनरायझर्स हैदराबाद (SRH)- 6 सामने, 2 विजय, NRR -1.245
सलग चार पराभवांनंतर सनरायझर्स हैदराबादने दुसरा विजय मिळाला, पण एसआरआरएच फॉर्म खूपच खराब आहे. फलंदाजीत कोणताही प्रवाह नाही, कॅच-अप गेम चालू आहे.
10- चेन्नई सुपर किंग्ज (CSK)- 7 सामने, 2 विजय, NRR -1.276
महेंद्रसिंग धोनीचा अनुभव असूनही संघ संतुलन गमावत असल्याचे दिसून येत आहे. सततच्या पराभवांमुळे पुनरागमनाचा मार्ग कठीण झाला आहे.
IPL Orange Cap 2025: ऑरेंज कॅप
पीबीकेएस विरुद्ध केकेआर सामन्यानंतर ऑरेंज कॅप लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू निकोलस पूरनकडे आहे. त्याने 7 डावांमध्ये 357 धावा केल्या आहेत. दुस-या क्रमांक साई सुदर्शनचा आहे, साईने 329 धावा केल्या आहेत. तिसरा क्रमांक मिचेल मार्शचा आहे. त्याने आयपीएलच्या या सीझनमध्ये 295 धावा केल्या आहेत
IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज
निकोलस पूरन (LSG)- 357
साई सुदर्शन (GT) - 329
मिचेल मार्श (LSG) - 295
श्रेयस अय्यर (PBKS)- 250
विराट कोहली (RCB) - 248
IPL Purple Cap 2025: पर्पल कॅप
चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज नूर अहमदकडे सध्या पर्पल कॅप आहे. नूर अहमदने 7 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.दुस-या क्रमांकावर सीएसकेचा खलील अहमद आहे, त्याने 11 विकेट घेतल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या टॉप 5 गोलंदाज
नूर अहमद (CSK)- 12
खलील अहमद (CSK)- 11
शार्दुल ठाकूर (LSG)- 11
कुलदीप यादव (DC)- 10
प्रसिद्ध कृष्ण (GT)- 10












Click it and Unblock the Notifications