Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Deven Bharti कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त देवेन भारती? जाणून घ्या त्यांच्याशी निगडीत खास गोष्टी

Who is IPS Deven Bharti know past life achievements : राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख आणि बृहन्मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांची मुंबईच्या पोलिस आयुक् पदी नियुक्ती करण्यात येत आहे. मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त होत असून त्यांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतील.

राज्याच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. देवेन भारती यांच्यासमोर मुंबईतील गुन्हेगारी, शहराची सुरक्षा तसेच कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक नियमनासोबतच बरीच महत्वाची आव्हाने त्यांच्यासमोर राहणार आहे. चला आज आपण मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणारे देवेन भारती कोण आहेत हे जाणून घेऊया.

who is IPS Deven Bharti

कोण आहेत देवेन भारती?

  • 1994 च्या आयपीएस तुकडीतील अधिकारी देवेन भारती आहेत. ते मुळ बिहारचे आहेत.
  • देवेन भारती यांनी विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा तपास करणाऱ्या दहशतवादी विरोधी पथकाचे त्यांनी नेतृत्व केले होते.
  • गुन्हे शाखेपासून सह पोलिस आयुक्त गुन्हे इतर महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
  • आता ते विशेष पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असून आज ते मुंबई पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.
  • महाराष्ट्र दहशतवाद विरोधी विभागाचे महासंचालक म्हणून त्यांनी यापुर्वी काम पाहिलेले आहे तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात त्यांचा सहभाग होता.

देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय

994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

काय होता त्यांच्याविषयी वाद

महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारच्या काळात, भाजप नेते हैदर आझम यांच्या पत्नीविरुद्ध खटला सुरू करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल भारती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता, आझम यांच्या पत्नीवर पासपोर्ट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप होता. तरीही, पोलिस तपासात कोणतेही पुरावे आढळले नाहीत आणि भारतीचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला नाही.

मुंबई पोलिस आयुक्त पद पदावनत (दर्जा कमी केला)

सुत्रांच्या माहितीनुसार, विवेक फणसाळकर निवृत्त होत असल्याने मुंबई पोलिस आयुक्त पद पदावनत करून पुन्हा अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे करण्यात आले आहे. देवेन भारती हे आज सायंकाळी औपचारिक कार्यक्रमात फसणळकर यांच्या कडून मुंबई पोलिस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारतील.

हेही वाचा : Mumbai New CP: मायानगरी मुंबईचे पुढील पोलिस आयुक्त कोण? 5 अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, वर्णी कुणाची?

हेही वाचा : Vivek Johnson : बीडचे नवे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन कोण आहेत? मुळ कुठले, आधी कुठे भुषवले पद

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+