Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Vaishnavi Hagawaneकेसमधील निलेश चव्हाण कोण, पत्नीसोबतच्या संबंधाचे Video बनवले, करिश्माशी नातं काय?

Who is Nilesh Chavan enter in Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. हा निलेश चव्हाण देखील मोठ्या कुरापती करणारा असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने स्वत:च्या पतीसोबत केलेल्या शारिरीक संबंधाचे असंख्य स्पाय कॅमेऱ्याच्या द्वारे असंख्य व्हिडिओ बनवल्याचे देखील समोर आले आहे. हा निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात कसा सहभागी आहे, त्याचा आणि हगवणे कुटुंबियांशी संबंध कसा आहे, यावर आज या लेखातून जाणून घेऊया.

Who is Nilesh Chavan

वैष्णवी हगवणे हे प्रकरण नेमकं काय आहे?

वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सर्व लोकांना अटक केली आहे. त्यातच आता हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप-हगवणे हीने देखील सासरकडील लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा नऊ महिन्यांचा मुलगा ज्या व्यक्तीच्या घरी होता त्या निलेश चव्हाणवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : वैष्णवीच्या तोंडावर थुंकली, मारहाण केली; कोण आहे वैष्णवी हगवणेची नणंद करिश्मा हगवणे उर्फ 'पिंकी ताई'

कोण आहे निलेश चव्हाण, जाणून घ्या त्याचे कारनामे?

निलेश चव्हाण या व्यक्तीचा कारनामा देखील भयंकर आहे. त्याने देखील स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ केला आहे. अतिशय क्रुरवृत्तीचा हा माणूस असल्याचे देखील उघडकीस आले आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याने निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल करण्यात आलेला आहे.

निलेश चव्हाणचे लग्न अन् बेडरुमधील स्पाय कॅमेरा दिसला

काही माध्यमांच्या अहवालानुसार, 3 जून 2018 ला निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारणा केली त्यावेळी तिला उडवाउडवीचे उत्तर दिली गेली. पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली.

एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप ओपन केला असता तिला तर धक्काच बसला. कारण, त्या लॅपटॉपमध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचे तिला आढळून आले. हे रेकॉर्डिंग व्यवस्थित झाले पाहिजे म्हणून निलेश हा बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन पत्नीशी शरीर संबंध ठेवत असे. त्याच लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले.

हे ही वाचा : माणसं म्हणावं की सैतान! वैष्णवी हगवणेच्या थोरल्या जाऊनेही सांगितली आपबीती, म्हणाली-सासू-दीर पाप ला..

..तर निलेशने पत्नीला चाकू दाखवून धमकावलं

निलेश चव्हाणच्या पत्नीने पतीच्या लॅपटॉपमधील कारनामे पाहिल्यानंतर तिने निलेशला जाब विचारला, त्याने घरातील चाकूने तिला धमकावलं आणि तिचा गळा देखील दाबला. त्याचबरोबर बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई - वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली असता त्यांच्याकडून तिचाच छळ सुरु करण्यात आला. त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करत राहिला.

अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला गुन्हा दाखल झाला. त्याचा अटकपूर्व जमीनअर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही.

अखेर मुंबई उच्च न्यालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला. निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय आहे आणि पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय करतो. निलेश चव्हाण हा शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचे समोर आले आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असल्याचे देखील समोर आले. दुसरी गोष्ट म्हणजे कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडीलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत. याच ठिकाणी निलेश चव्हाण राहत असे.

हे ही वाचा : असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नको,..तर मला फासावर चढवा; अजित पवार हगवणे कुटुंबियांवर संतापले

अखेर निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल

कस्पटे कुटुंबीयांच्या म्हणजे मृत वैष्णवी हगवणेच्या माहेरच्या लोकांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना तेथून जाण्यास सांगितले. कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता.

वैश्नवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक व वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचे देखील समोर आलेले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+