असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नको,..तर मला फासावर चढवा; अजित पवार हगवणे कुटुंबियांवर संतापले
माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत,, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्याविषयी बोलताना अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते माध्यमांशी बोलत होते.
असले नालायक लोक मला नकोत
अजित पवार म्हणाले, माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून जबाबदारी म्हणून जे काही करायचे आहे ते आम्ही केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

...तर मला फासावर लटकवा
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही, फक्त लग्नाला गेलो म्हणून माझी बदनामी केली गेली. या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. दोघे फरार आहेत. शोधासाठी आणखी पथके वाढवायला सांगितली आहेत.
तसेच जर अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकवा. माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा. उगाच बदनामी केली जाते. मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले. स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात असेही विचारले होते. मग माझी का बदनामी करता. गुन्हा नोंद झाला आहे. सीपींना सांगितले कारवाई झाली पाहीजे, असेही ते म्हणाले.
आम्ही सांगतो का सुनेशी असे वागा?
अजित पवार म्हणाले, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता. मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो. मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केले, तर त्याला अजित पवार काय संबंध आहे. अजित पवारांनी सांगितले का असे कर म्हणून मला तर कळतच नाही. मी
घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या पोलिस आयुक्तांना मी फोन केला आणि म्हटले कोणी का असेना कारवाई करा. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद आतमध्ये आहे. सगळे अटकेत आहेत. सासरा पळून गेला. तो पण सापडेल, पळून जातो कुठे? यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? प्रेमापोटी लोक बोलावतात तिथे जावे लागते, नाही गेले तर माणसे रुसतात, लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असे वागा म्हणून, असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications