Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माणसं म्हणावं की सैतान! वैष्णवी हगवणेच्या थोरल्या जाऊनेही सांगितली आपबीती, म्हणाली-सासू-दीर पाप ला..

Vaishnavi Hagawane News, Mayuri Jagtap-Hagawane Story : सासरकडील लोकांकडून होणाऱ्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane Death) वय- 23 हिने राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक झाली आहे. तर सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.

Vaishnavi Hagavane

राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. आता हगवणेंची दुसरी अर्थात सून मयुरीने देखील धक्कादायक कहाणी सांगितली आहे. मयुरी जगताप-हगवणे हीने देखील माध्यमांसमोर येऊन हगवणे कुटुंबियातील लोकांची नीचप्रवृत्ती व क्रुरवृत्तीची कहाणी सांगितल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.

हे ही वाचा : Vaishnavi Hagwaneचे बाळ अखेर तिच्या वडिलांकडे सुपूर्द; 2 दिवसांपूर्वी तिच्या मामांना दिली होती धमकी

मयुरीची आई काय म्हणाली?

हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप-हगवणे हीने देखील तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. छोटी जाऊ वैष्णवी हगवणेने स्वत:ला संपविल्यानंतर तिची मोठी जाऊ मयुरीने माध्यमांसमोर काही गोष्टी उघड केल्या. मयुरी जगतापची आईने देखील माध्यमांशी बोलताना सांगितले की, हगवणे कुटुंबीयांनी माझ्या मुलीलाही मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे. शशांक हगवणे, करिष्मा हगवणे आणि लता हगवणे यांनी तिला वारंवार त्रास दिला. मात्र, माझ्या मुलीने त्रास होत असल्याची माहिती वेळोवेळी मला दिली होती.

'मला त्रास दिला जातोय, मारहाण होतेय,' असे ती नेहमी सांगायची." "या प्रकरणी आम्ही दोन-तीन वेळा कुटुंबीयांसोबत बैठक घेतली आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुलीला समजावूनही सांगितले. तिने काही काळ सहन केले, पण सहन करण्याची देखील काही मर्यादा असते. जेव्हा ती मर्यादा ओलांडली, तेव्हा तिच्यासाठी ते सहन करणे अशक्य झाले. तिला मारहाण करण्यात आली, अखेर तिला आम्ही आमच्या घरी आणले होते.

दीर, सासू व नणंदेकडून वाईट वागणूक

मयुरी जगतापच्या आई पुढे म्हणाल्या की, आम्ही जेव्हा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो, तेव्हा सुरुवातीला पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही. मुलीच्या लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने सर्व काही ठीक होते. मात्र, त्यानंतर करिष्मा हगवणे आणि शशांक हगवणे यांनी तिचा छळ सुरू केला. मुलीच्या पतीचा या त्रासात कुठलाही सहभाग नव्हता. उलट, त्याने नेहमीच तिचा पाठिंबा दिला. आजही तो तिच्या संपर्कात आहे. 14 जानेवारीपासून माझी मुलगी आमच्याकडेच राहते. आणि तिचे पती येऊन-जाऊन तिची भेट घेतात. त्यांना या प्रकरणाचा विरोध नाही. करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी सर्वाधिक त्रास दिला, तर सासू लता हगवणे सुरुवातीला चांगल्या वागल्या, पण नंतर त्यांचीही वागणूक बदलली, असेही मयुरीच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

मयुरी जगपात यांनी काय केला गौप्यस्फोट?

मयुरी जगताप म्हणाला की, माझं सुशील हगवणे यांच्याशी 2022 साली लग्न झालं. माझी नणंद, दीर, सासू हे कायम मला त्रास द्यायचे. माझ्या सासून लाड केले तर नणंद तिचे लाड करायला नको, असं सांगायची. त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन ते मला त्रास द्यायचे. पण या सर्वांमध्ये चांगली बाब म्हणजे माझ्या पतींनी मला कायम साथ दिली. त्यांनी त्यांच्या मुलालाही मारहाण केलेली आहे. माझे पती माझी बाजू घ्यायचे म्हणून हगवणे कुटुंबाने त्यांनाही मारहाण केलेली आहे. आम्ही दीड वर्षांपासून वेगळे रहात होतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+