Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Vaishnavi Hagwaneचे बाळ अखेर तिच्या वडिलांकडे सुपूर्द; 2 दिवसांपूर्वी तिच्या मामांना दिली होती धमकी

Vaishnavi Hagwane Sucide Case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीने आत्महत्या केली. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाला घ्यायला गेलेल्या तिच्या मामांनी तर थरारक अनुभव कथन केला. ते म्हणाले की, मी माझ्या भाचीच्या मुलाला आणायला गेलो तर मला बंदूकीचा धाक दाखवला गेला, तसेच बाळ देखील दिले नाही, असा दावा केला. दरम्यान, आज चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दि.22 वैष्णवीचा मुलगा अखेर कस्पटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले.

कसं मिळाले बाळ?

पुण्यातील मुळशी तालुक्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने सासरच्या छळाला कंटाळून (दि.१६ मे) रोजी आत्महत्या केली होती. वैष्णवी हगवणेच्या मृत्युंनंतर तिचे दहा महिन्यांचे बाळ आईपासून पोरकं झाले होते.

आईच्या मृत्युंनंतर ते बाळ राजेंद्र हगवणे यांच्या परीचयाचे निलेश चव्हाण यांच्याकडे असल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. अखेर हे बाळ हगवणे यांच्या नातेवाईकांच्या मदतीने वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. कोणी आणून दिले, हायवेवर कोण आले होते, याची काहीही वैष्णवीच्या वडिलांनी नव्हती.

Vaishnavi Hagwane Suicide Case

नेमकी काय घडली घटना?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष असलेले राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने काल रात्री आत्महत्या केली. त्याघटनेनंतर वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मुलाचा ताबा घ्यायला गेले तर बंदूक दाखवली

वैष्णवीच्या निधनानंतर तिच्या 10 महिन्यांचे मुल घेण्यासाठी तिच्या माहेरच्या लोकांनी काल हगवणे कुटुंबियांकडे गेले. या मुलाचा ताबा घेण्यासाठी वैष्णवी हिचे मामा गेले होते. पण, त्यांना ते बाळ दिले नाही. यावेळी त्यांनाच दम भरला गेला.

वैष्णवीचे मामा नेमकं काय म्हणाले?

वैष्णवीचे मामा यांनी काही माध्यमांशी बोलताना सांगितले की, परवा राजेंद्र हगवणे यांचे थोरले बंधू जयप्रकाश हगवणे यांनी मला फोन केला. यावेळी त्यांनी तो मुलगा खूप रडत आहे. तुम्ही काहीतरी करा असं सांगितले. म्हणून मी घरी सर्वांसोबत चर्चा केली, त्यानंतर आम्ही त्या मुलाला आणायला गेलो. यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला बोलावून घेतले.

त्यांनी आम्हाला वारजे येथील एका सोसायटीत घेऊन गेले. या ठिकाणी ते मुल होते. यावेळी आम्ही त्यांना तुम्हीच ते मुल आम्हाला आणून द्या असे सांगितले. ते ठीक आहे म्हणाले. त्यांनी त्यांच्या मुलाला बोलावले, त्या मुलाच्या कमरेला रिव्हॉल्वर होती म्हणून आम्ही घाबरलो. त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिले.

दरम्यान, त्या वेळेला त्यांचा मुलगा सारखा त्या रिव्हॉल्वरला हात लावत होता, म्हणून आम्ही घाबरलो. आम्ही बाळासाठी पोलिसांसोबत बोललो. पोलिसांनी आम्हाला कात्रजचा घाट दाखवला. मुल संवेदनशील आहे, ओळखीच्या व्यक्तीशिवाय राहत नाही. ते मुल तिसऱ्याच व्यक्तीजवळ आहे. ते बाळ आम्हाला मिळावे, असंही वैष्णवीचे मामा म्हणाले. त्या सोसायटीत आज बाळ नाही दरम्यान, आज त्या सोसायटीत बाळ नसल्याचे समोर आले आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांना काय सांगितले?

वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले की, माझा भाऊ मोहन, माझा मुलगा विराज आणि माझे दाजी उत्तम बहिरट हे तिघेजण बाळाला आणायला गेले होते, आता मला तिथून फोन आला होता. तिथं बाळ दिसत नाही. ते पिरंगुटच्या इकडे असण्याची शक्यता असल्याची माहिती माझ्या भावाने दिली आहे. काल बाळ आणायला गेल्यावर त्यांनी आम्हाला बंदूक दाखवली होती, त्यानंतर बातम्या आल्या. त्यामुळे तो फरार झाला, जर आम्हाला बाळ नाही मिळाला तर आम्ही कोर्टात जाणार, असेही मृत वैष्णवीचे वडील यांनी सांगितलं.

अखेर बाळ कस्पटे कुटुंबियांच्या हाती लागलं

वैष्णवीच्या मृत्युंनंतर वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ हे आईपासून पोरके झाले. वैष्णवीचे बाळ हे निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामाने केला होता. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनर असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत चव्हाण राहायला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बाळाला ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. अखेर वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, बाणेरच्या हायवेवर बाळ अज्ञात व्यक्तीने आमच्याकडे (कस्पटे कुटुंबिय) सोपवले आहे. आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तुम्ही ज्या बाळाच्या शोधात आहात ते माझ्याकडे आहे, मला ते तुम्हाला द्यायचे आहे असे त्याने फोनवरून संगितले. आणि आम्हाला बाणेर हायवेला बाळ घेण्यासाठी बोलवले. तिथं गेल्यावर त्या अज्ञात व्यक्तीने बाळ आमच्या ताब्यात दिले. आता आम्हाला खूप आनंद होतोय

त्या प्रकरणाची माझा काय संबंध- अजित पवार

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात समजल्यानंतर आपण तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले, असे अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. अजित पवार म्हणाले. "मला कळताच पोलिसांना सांगितले ऍक्शन घ्या. सगळे अटकेत आहेत सासरा पळून गेला. पळून पळून जातो कुठं?" असा सवाल करत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

या प्रकरणाशी आपलं नाव जोडलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी थेट जाब विचारला. "यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकावा," असंही अजित पवार म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+