वैष्णवीच्या तोंडावर थुंकली, मारहाण केली; कोण आहे वैष्णवी हगवणेची नणंद करिश्मा हगवणे उर्फ 'पिंकी ताई'
vaishnavi hagawane news marathi : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सद्या राज्यभरात प्रचंड चर्चेचा विषय बनले आहे. तर राज्यभरात या घटनेनंतर संताप देखील व्यक्त केला जात आहे. माणसाला पैशाची किती हाव असावी, याची काही परिसीमा राहिली नाही का, असा सवाल देखील आता विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या मुलांसह त्यांची मुलगी देखील वैष्णवीच्या मृत्यूस कारणीभूत मानली जात आहे.
तिने भावजयीला ज्या पद्धतीने त्रास दिला, तिच्या अंगावर थुंकली व तिचा मानसिक छळ केला, या घटनेमुळे नेमकी तिची नणंद करिश्मा हगवणे कोण आहे, तिचे शिक्षण काय झाले तसेच ती कोणत्या पक्षासोबत कार्यरत होती. तिची अशी वागणूक का होती, असा सवाल देखील विचारला जात आहे. आजच्या लेखात आपण करिश्मा हगवणे हिच्याविषयी जाणून घेणार आहोत, व तिच्यावर वैष्णवीच्या मृत्यूस कारण म्हणून गुन्हा कसा दाखल झाला, याविषयी जाणून घेऊया..!

पुण्यातील राजेंद्र हगवणे यांची लहान सून असलेली वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे यांना देखील ताब्यात घेतले. 16 मे रोजी झालेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
अशातच मृत वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हीने देखील सासरच्या कुटुंबाबाबत हादरवणारी माहिती दिली आहे. याप्रकरणात नणंद करिश्मा हगवणे वर देखील तीने धक्कादायक आरोप केलेले आहेत. घरातील प्रत्येक निर्णय हा करिश्मा म्हणजेच 'पिंकी' घ्यायच्या असं तिने सांगितलं. त्याचबरोबर वैष्णवीने आपल्या मैत्रीणीला घरातील त्रासाबाबत सांगताना नणंदेने त्रासाचा उल्लेख केला होता. वैष्णवीच्या वडिलांनी देखील विविध माध्यमांशी बोलताना करिश्मा हगवणे उर्फ पिंकी ताईच्या कारनाम्याची कहाणी सांगितली.
कोण आहे करिश्मा हगवणे?
करिश्मा ही वैष्णवीची नणंद आहे. तिच्यावर वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. सुशील हगवणेची पत्नी मयुरी जगताप हिनेही तिच्यावर असाच आरोप केला आहे. करिश्मा हगवणेच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, करिश्मा एक फॅशन डिझायनर आहे.
तिचा 'लक्ष्मीतारा' नावाचा एक ब्रँड आहे. रिपोर्टनुसार, तिचे दुकान कोथरुडमध्ये आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवर, तिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटोही पोस्ट केलेले आहेत.
पिंकी ताईचे राजकीय कनेक्शन कसे?
करिश्मा हगवणे उर्फ पिंकी ताईचे आणखी फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये तिचे बड्या राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचं दिसून येते. पिंकी ताईचा सुप्रिया सुळेंसोबतचाही फोटो समोर आला आहे. अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मिडिया एक्सवर याबाबतची पोस्ट केली.
करिश्मा हगवणेचा शरद पवार यांच्यासोबतचाही फोटो यामध्ये आहे. हे पण वरवरचे संबध आहेत का?, असा सवालही या पोस्टमध्ये दमानिया यांनी केला. दमानिया यांनी या पोस्टमध्ये एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार करिश्मा हगवणेसोबत एका कार्यक्रमात दिसल्या.












Click it and Unblock the Notifications