Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

GBS साधासुधा नाही, त्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा बळी घेतलाय; वाचा धोके, लक्षणे, उपाय

गुईलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच GBS हा साधासुधा आजार नाही. याच आजाराने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रॅकलिन डी रुझवेल्ट यांचा बळी घेतला होता, असे सांगितले जात आहे. सध्या या आजाराने पुण्यात थैमान घातले असून एकाच आठवड्यात सुमारे १०० रुग्ण या आजाराचे बळी पडल्याचे सांगितले जात आहे. त्यातील १६ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. काय आहे हा आजार, काय आहेत लक्षणे, काय आहेत उपाय... याच प्रश्नांची उत्तरे आपण शोधूयात...

GBS disease

पुणे ते सोलापूर पोहोचला

गुईलेन बॅरी सिंड्रोम हा आजार पुण्यातून आता सोलापूरालाही सरकला आहे. पुण्यात १०० हून अधिक रुग्ण असून त्यापैकी १६ रुग्ण हे व्हेंटिलेटवर असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याच आजाराबाबत आरोग्य विभागाचा आढावा घेतला. हा आजार आता सोलापूरालाही पोहोचला आहे. हा एक ऑटोईम्यून न्यूरोलाँजिकल डिसऑर्डर आहे. या आजारात आपली रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्या नसांवर हल्ला करते. त्यामुळे लोकांना उठणे-बसणे, चालणे याला त्रास होतो. अर्धांगवायूची समस्या होते.

रुझवेल्ट हेही पडले बळी

गुईलेन बॅरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. एक लाख लोकांपैकी एक किंवा दोन लोकांना तो दरवर्षी होतो. या आजारात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांचा मृत्यू झाला होता. वास्तविक, या आजारामुळे रुझवेल्ट यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यांच्या कमरेच्या खालचा भाग काम करत नव्हता. रुझवेल्ट यांचा मृत्यू पोलिओमुळे झाल्याचे सांगितले गेले. मात्र नंतर संशोधनातून गुईलेन बॅरी सिंड्रोम हेच त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले गेले.

काय आहेत लक्षणे

हात-पाय किंवा घोट्यात मुंग्या येणे. पायात अशक्तपणा जाणवणे, चालण्यात अशक्यतपणा जाणवणे. पायऱ्या चढताना त्रास होणे, बोलणे-गिळणे-चघळण्यास त्रास होणे. स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे. लघवी व शौचास त्रास होणे. श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

काय आहेत उपाय

या आजारासाठी डाँक्टर दोन पद्धती वापरतात. पहिली आहे प्लाझ्मा एक्सचेंज. यामध्ये प्लाझ्मासाठी रक्ताची देवाणघेवाण केली जाते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून मज्जासंस्थेला आराम दिला जातो. दुसरी आहे. इम्युनोग्लोब्युलिन थेरपी. यात रोगप्रतिकार शक्तीच्या विरोधात काम करणाऱ्या अँटीबाँडिजचा डोस दिला जातो. ज्यामुळे चेतापेशींचे नुकसान होण्यासापासून वाचवले जाते. याशिवाय पेनकिलर व फिजिओथेरपीचा वापरही काही रुग्णांवर केला जातो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+