बीडमधील गुंडाराज कमी होईना; सपासप वार करुन सख्ख्या भावांना ठार मारले, दुसऱ्या घटनेत तरुणावर गोळीबार
संतोष देशमुख प्रकरण ताजे असतानाच आज बीड जिल्हा पुन्हा दोन प्रकरणांनी गाजला. आष्टी तालुक्यात वहिरा गावात नातेवाईकांतील जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांना ठार मारण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत आंबेजोगाई येथे एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. बहिणीचे लग्न आपल्याशी लावून देत नसल्याने हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सख्या भावांना मारले
आष्टी तालुक्यातील वहिरा गावात दोन गटांत तुबळ राडा झाला. आदिवासी समाजातील नातेवाईकात जुन्या कारणांतून झालेल्या वादांत सख्ख्या तीन भावांवर हल्ला झाला. त्यात धारदार शस्त्राने वार केल्याने दोन भाऊ जागीच ठार झाले तर तिसऱ्या भाऊ गंभीर जखमी झाला. जखमी कृष्णा भोसले याच्यावर अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत अजय भोसले व भरत भोसले हे दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आठ जणांना अटक
पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांची फोज घटनास्थळी आणली. त्यानंतर तीन पथके करुन आरोपींचा शोध घेतला जात आहे. खून झालेले व ज्यांनी हल्ला केला ते आरोपी या सर्वांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे समजते. पोलिसांनी आत्तापर्यंत आठ संशयीतांना ताब्यात घेतले असून, अजूनही इतरांचा शोध सुरु असल्याचे समजते.
अंबाजोगाईत गोळीबार
दुसऱ्या घटनेत पुण्यात साँफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीच्या भावावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत या तरुणीचा भाऊ थोडक्यात बचावला. आपल्या बहिणीचे लग्न माझ्याशी लावून देत नसल्याच्या करणातून आरोपी गणेश चव्हाण याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार केल्यानंतर गणेश चव्हाण हा पळून गेला होता. पोलिसांच्या दोन पथकाकडून त्याचा शोध सुरु होता. अखेर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गोविंदनगर भागात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.












Click it and Unblock the Notifications