Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सतीष वाघ मर्डर केस! शेजाऱ्याशी प्रेम,आमदाराच्या मामीनं अडसर ठरणाऱ्या मामाचा 5 लाख देऊन काढला काटा!

Satish Wagh murder case : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही आठवड्यांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. नंतर त्यांचा मृतदेह घाटात फेकून देण्यात आला होता. यात आता एक मोठा खुलासा झाला आहे. सतीष वाघ यांच्या पत्नीचा या प्रकरणात हात असल्याचे तपासातून पुढे आले आहे. शेजाऱ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असल्याने पती सतीष वाघ यांचा 5 लाखांची सुपारी देऊन पत्नी मोहिनी वाघ हिने काटा काढला अशी माहिती समोर आली आहे.

Satish Wagh murder case

हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खुनात आता पत्नी मोहिनी वाघ ही या प्रकरणातील संशयीत आरोपी आहे. तत्पुर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. काही आठवड्यांपूर्वी सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता.

पत्नी मास्टरमाईंड? तपास सुरुच

सतीष वाघ यांच्या हत्येसह संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर येत आहे. दरम्यान पोलिस अजून कसोशीने तपास करत आहेत.

हेही वाचा : 'त्या' आमदारांच्या मामाचे भर चौकातून अपहरण; भर चौकात घटना घडल्याने पुण्यात एकच खळबळ

आतापर्यंत यांना झाली अटक

भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सतीश वाघ हे मामा होते. सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आतापर्यंत अटक असलेल्या संशयीत आरोपींमध्ये मोहिनी वाघ, पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव (रा. धाराशिव), अक्षय जवळकर अशी संशयितांची नावे आहेत. यात जवळकर याला सुपारी देण्यात आली होती अशी माहिती पुढे येत आहे.

हेही वाचा : धक्कादायक! हिंगोलीत पोलिस कर्मचाऱ्याची घरात फायरिंग; पत्नीचा मृत्यू, सासू, मेव्हुणा, मुलगी जखमी

नेमकी कशी घडली होती घटना?

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिष वाघ यांचे अपहरण करण्यात आले आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हाँटेल ब्यूबेरीसमोर थांबलेले होते. त्यावेळी शेवरलेट एन्जाँय या कंपनीची गाडी त्यांच्याजवळ आली. त्या गाडीतून दोघे खाली उतरले. त्यांनी वाघ यांच्याशी काहीतरी बातचीत केली. कदाचित पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ही बातचीत सुरु होती. त्यानंतर या दोघांनी वाघ यांना गाडीत बळजबरी बसवले आणि तेथून निघून गेले.

हेही वाचा : 450 सीसीटीव्ही तपासल्यावर उकललं आमदाराच्या मामाच्या हत्येचं गूढ, 'या'साठी झाला सतिष वाघ यांचा खून

अशी फुटली होती अपहरणाला वाचा

सतीष वाघ हे बराच वेळ घरी न आल्याने त्यांच्या मुलाने परिसरात शोधाशोध सुरु केली. त्यानंतर त्यांच्या मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनीही तातडीने पावले उचलली. त्यावेळी ब्लू बेरी हाँटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्यात गाडी व त्यातून दोघे वाघ यांच्याशी बोलताना दिसले. आरोपी नेमके कोण होते? त्यांचा अपहरणाचा उद्देश काय? अपहरण नेमकं का केलं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरु केला होता. आता यात उलगडा हळूहळू होत आहे.

हेही वाचा : 450 सीसीटीव्ही तपासल्यावर उकललं आमदाराच्या मामाच्या हत्येचं गूढ, 'या'साठी झाला सतिष वाघ यांचा खून

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+