450 सीसीटीव्ही तपासल्यावर उकललं आमदाराच्या मामाच्या हत्येचं गूढ, 'या'साठी झाला सतिष वाघ यांचा खून
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या हत्येचं गूढ अखेर उकललं आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. मृत सतीष वाघ यांच्या हत्येतील आरोपींपैकी तीन जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे. पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.

16 पथकांनी केला तपास
राजकारणात नसलेल्या व कुणाशीही वैर नसणाऱ्या सतीष वाघ यांचा मंगळवारी पहाटे अपहरण करुन खून करण्यात आला होता. मृत सतीष वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते. या प्रकारानंतर पुण्यातील पोलिसांनी तातडीने पावले उचलली. तब्बल 16 पथकांनी तपास सुरु केला. यासाठी तब्बल 450 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संशयीतांची धरपकड करत या खूनाच्या कारणाचा छडा लावला. सतीष वाघ हे राजकारणात नसल्याने व त्यांची कुणाशीही दुश्मनी नसल्याने पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे दिव्य होते. मात्र ते पोलिसांनी पार केले.
शेजाऱ्यानेच दिली सुपारी
सतीष वाघ यांची हत्या त्यांच्या शेजारच्या व्यक्तीनेच सुपारी देऊन केली होती, अशी माहिती तपासातून पुढे आली. शेजारी राहणाऱ्या इसमानेच सतीष वाघ यांच्या हत्येसाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणानंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. वाघ यांचे कुणाशीही वैर नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले होते. मात्र पोलिसांनी साडेचारशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संशयीतांना पकडले.
सुपारी देणाऱ्याला अटक
पोलिस आयुक्त अखिलेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, या घटनेतील एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सतीष वाघ यांना चौघांनी गाडीत बसवले होते. त्या चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 1 आरोपी फरार आहे. पुणे पोलिसांकडून त्या फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सतीश वाघ यांच्या शेजारील व्यक्तीने वैयक्तिक वादातून त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुपारी देणाऱ्या शेजाऱ्याला देखील अटक केली आहे.
काय म्हणाले पोलिस आयुक्त?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "पुणे क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी अतिशय युद्ध पातळीवर या गुन्ह्याचा तपास केला. अजूनही तपास सुरु आहे. सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या प्रकरणात काम करत होते. पोलिसांनी तपासाच्या पहिल्याच दिवशी 450 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्या आधारावर पोलिसांनी जलद गतीने तपास करत अपहरण करताना वापरलेली गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर हळूहळू आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलीस या प्रकरणी ठोस पुरावे गोळा करत आहेत. या प्रकरणात ज्या व्यक्तीने 5 लाखांची सुपारी दिली होती त्याची चौकशी सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications