Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धक्कादायक! हिंगोलीत पोलिस कर्मचाऱ्याची घरात फायरिंग; पत्नीचा मृत्यू, सासू, मेव्हुणा, मुलगी जखमी

Hingoli crime news policeman's firing wife dies : हिंगोलीत एक धक्कादायक घटना घडली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने फायरिंग केल्याने पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर याच घटनेत मुलगी, सासू आणि मेव्हाण गंभीर जखमी झाला. ही घटना 25 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल

घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. दरम्यान घटनेचा सर्वकष पातळीवर तपास सुरु करण्यात आला आहे. या गोळीबारामागील मुळ कारणही पोलिस शोधत आहेत.

Hingoli crime news policeman s firing wife dies

घरी आले अन् फायरींग केली! पत्नीचा गेला जीव

वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी विलास बळीराम मुकाडे यांचे हिंगोली शहरातील प्रगतीनगरात घर आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते घरी आले असता त्यांनी पत्नीवर गोळी झाडल्याचे बोलले जात आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला.

हेही वाचा : कल्याण येथील अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

गोळीबारात तिघे जखमी

पोलिस कर्मचाऱ्याने घरात केलेल्या गोळीबारात मुलगी, सासू व मेव्हुणा जखमी झाला आहे. या तिघांवरही कर्मचाऱ्याने गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. जखमी मुलगी, सासू आणि मेव्हुण्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करून नांदेडला रेफर करण्यात आले आहे.

हेही वाचा : संतोष देशमुखांचे डोळे जाळले नाही! कशी घडली हत्या; CM फडणवीसांनी सभागृहात सर्वच थरारच सांगितला!

गोळीबाराचे कारण अस्पष्ट

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस निरीक्षक श्यामराव डोंगरे आदींचे पथक विलास मुकाडे यांच्या घरी दाखल झाले. या घटनेनंतर विलास मुकाडे हा पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनेचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा : चित्रपटसृष्टीवर शोककळा; 'कांगुवा' फिल्म एडिटरचा राहत्या घरात आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+