Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चित्रपटसृष्टीवर शोककळा; 'कांगुवा' फिल्म एडिटरचा राहत्या घरात आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

Kanguva editor Nishad Yusuf dead : मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध चित्रपट एडिटर निशाद युसूफ यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. बुधवारी कोचीच्या अपार्टमेंटमध्ये युसूफचा मृतदेह सापडला होता. सध्या त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले नसून, पोलिसांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. काही माध्यमांनी सांगितले की, त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरळ (FEFKA) डायरेक्टर्स युनियनने निषाद युसूफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आपल्या फेसबुक पेजवर निशाद युसूफ यांचा फोटो शेअर करताना युनियनने लिहिले की, 'बदलत्या मल्याळम सिनेमाचे समकालीन भविष्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे चित्रपट एडिटर निशाद युसूफ यांचे आकस्मिक निधनाने मोठी शोकळका पसरली आहे. त्याचा सारखा एडिटर होणे नव्हे,अशा भावना युनियनने व्यक्त केल्या.

Kanguva editor Nishad Yusuf dead

सूर्याने निशाद वाहिली आदरांजली

'कांगुवा' अभिनेता सूर्यानेही X वर पोस्ट करताना निषादच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. निषादचा फोटो शेअर करताना त्याने लिहिले - निषाद आता नाही हे ऐकून मन दुखावले! टीम 'कांगुवा' ची एक शांत आणि महत्वाची व्यक्ती म्हणून तुम्ही नेहमी लक्षात राहाल. आमच्या विचार आणि प्रार्थना मध्ये. निषादच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.

निशाद युसूफला सर्वोत्कृष्ट एडिटर पुरस्कार

निशाद युसूफच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तो 'उंडा' आणि 'थल्लूमला' सारख्या चित्रपटातील कामासाठी ओळखला जातो. त्याला नुकताच सर्वोत्कृष्ट एडिटर केरळ राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला. तो सूर्या आणि बॉबी देओल स्टारर आगामी 'कंगुवा' या चित्रपटाचा एंडिटर आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून त्याआधीच त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. याशिवाय निषादने मामूट्टीच्या आगामी 'बाजूका' या चित्रपटातही काम केले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+