'त्या' आमदारांच्या मामाचे भर चौकातून अपहरण; भर चौकात घटना घडल्याने पुण्यात एकच खळबळ
पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात आता पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे भर चौकातून अपहरण करण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील शेवाळवाडी परिसरातून हे अपहरण करण्यात आल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी कशी घडली घटना?
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिष वाघ यांचे अपहरण करण्यात आले आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हाँटेल ब्यूबेरीसमोर थांबलेले होते. त्यावेळी शेवरलेट एन्जाँय या कंपनीची गाडी त्यांच्याजवळ आली. त्या गाडीतून दोघे खाली उतरले. त्यांनी वाघ यांच्याशी काहीतरी बातचीत केली. कदाचित पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ही बातचीत सुरु होती. त्यानंतर या दोघांनी वाघ यांना गाडीत बळजबरी बसवले आणि तेथून निघून गेले.
अशी फुटली अपहरणाला वाचा?
सतीष वाघ हे बराच वेळ घरी न आल्याने त्यांच्या मुलाने परिसरात शोधाशोध सुरु केली. त्यानंतर त्यांच्या मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनीही तातडीने पावले उचलली. त्यावेळी ब्लू बेरी हाँटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्यात गाडी व त्यातून दोघे वाघ यांच्याशी बोलताना दिसले. आरोपी नेमके कोण होते? त्यांचा अपहरणाचा उद्देश काय? अपहरण नेमकं का केलं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरु आहे.
पुण्यात उडाली खळबळ
पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाहीय. आता तर लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळला आहे. एका चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी आमदारांच्या मामाचं अपहरण केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परंतु पुण्यासारखा सुसंस्कृत शहरात अशी घटना घडल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.












Click it and Unblock the Notifications