ओ अनिलबाबू..! कर्म तुम्ही कराल अन् दोष आमच्या नेत्यांवर टाकाल; चित्रा वाघ देशमुखांवर कडाडल्या
Chitra Wagh on Anil Deshmukh : गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे काम देशमुख यांनी केल्याचा आरोप आहे. यावरुन अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा देखील दाखल केलेला आहे. तर याच प्रकरणावर लक्ष्य केंद्रीत करत अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
फडणवीसांच्या कृपेने आता माझ्या घरावर छापा पडू शकतो, मला लवकरच अटक देखील होऊ शकते, असा दावा देशमुखांनी केला. त्यांच्या आरोपानंतर आता भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देशमुख यांचा समाचार घेतला.

अनिल देशमुख यांनी काय केला होता आरोप?
माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, जळगावमधील चार वर्षांपूर्वीचं एक जूने प्रकरण उकरून काढत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने 'सीबीआय'ने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. जळगावमधील भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या एका प्रकरणात मी गृहमंत्री असताना पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 10, 2024
4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा…
देशमुख पुढे म्हणाले की, माझी माहिती अशी आहे की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने माझ्या घरी कधीही छापा पडू शकतो किंवा मला अटक केली जाऊ शकते. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला सर्व माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी ईडी आणि 'सीबीआय'चा वापर करत राज्यातील राजकारण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी माहिती आहे की, मला अटक केलं जाईल. मला अटक करायचं असेल तर मी तयार आहे".
चित्रा वाघ यांनी घेतला खरपूस समाचार?
एक्स समाज माध्यमावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, कर्म तुम्ही कराल अन् दोष आमच्या नेत्यांवर टाकाल, हे चालणार नाही. ओ अनिलबाबू... 4 वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही, ते तुमचे कर्म आहे. सारे पुरावे विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत. माध्यमांकडेही त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या अधिकार्यावर तुम्ही दबाव टाकला, त्या अधिकार्यानेच जबाब दिला आहे. कर्म तुम्ही कराल आणि दोष आमच्या नेत्यांवर टाकाल, हे चालणार नाही.
ओ अनिलबाबूऽऽऽऽऽ @AnilDeshmukhNCP
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 10, 2024
4 वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही, ते तुमचे कर्म आहे…
सारे पुरावे विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत.
माध्यमांकडेही त्याचे व्हीडिओ आहेत.
ज्या अधिकार्यावर तुम्ही दबाव टाकला, त्या अधिकार्यानेच जबाब दिला आहे..
कर्म तुम्ही कराल आणि दोष… https://t.co/IuDs2gx9aI
सरकारी वकील कट रचतो, गृहमंत्री एसपींवर दबाव टाकतात, त्याचे स्टींग सभागृहात येते, सीबीआय चौकशीचे आदेश हायकोर्ट देते आणि तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांवर आरोप करणार? त्यापेक्षा गिरीश महाजन तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही कुणाचा दबाव आहे आणि म्हणून मला खोटा गुन्हा दाखल करावाच लागेल असे सांगितले होते, ते एकदा सांगूनच टाका. आहे हिंमत? असा पलटवार चित्रा वाघ केला आहे.












Click it and Unblock the Notifications