नवरात्रीत काळाचा घाला! तुळजाभवानीच्या दर्शनाहून येताना कार- ट्रकचा अपघात दोन ठार! 2 दिवसांत 5 ठार
Sangola car truck accident : ऐन नवरात्रीत दुःखद बातमी समोर आली आहे. तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन परत जाताना भाविकांच्या कारची- ट्रकसोबत भीषण धडक बसली. हा अपघात सांगोल्याजवळ आज पहाचे चारच्या सुमारास घडला. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
असा झाला अपघात
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पाठीमागून मालट्रकला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघेजण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. सोलापूर - सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास (ता. सांगोला) येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

जखमी आणि मृतांची नावे
सुखदेव बामणे (40) व नैनेश कोरे (31 दोघेही रा. नांदणी जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे (42, रा.नांदणी), सुधीर चौगुले (35 रा.वडगाव), सुरज विभुते (21 रा.कोठली) हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तकार रोडवरुन बाजूला काढून जखमींना उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.
दर्शनासाठी गेले होते तुळजापूरला
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९ ०८ या कार मधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शनानंतर त्याच कारमधून पाचजण सोलापूरकडून हायवेने नांदणी . कोल्हापूर गावाकडे निघाले होते. वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपास वर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या १६ चाकी एम पी -२० झेड एम -९५१८ या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात झाला.
कारमधून दोघे उडून बाहेर फेकले
अपघात इतका भीषण होता की, कार मधील दोघेजण उडून बाहेर फेकल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता तर चालक कार मध्ये अडकून पडल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढून मदत केली.
कालही मायलेकरासह पाच जण झाले होते ठार
कासपठार पाहायला जाताना कार आणि टेम्पोचा भीषण अपघात होऊन मायलेकरासह 4 जण ठार झाल्याची घटना काल घडली होती. या अपघातात 3 जण जखमी झाले होते. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कारुंडे गावानजिक आज दुपारी दीडच्या सुमारास घडला होता. पंढरपूर फलटण मार्गावरील कारुंडे नातेपुते ता माळशिरस येथील पुलावर दुपारी एक ते दीडच्या सुमारास टेम्पो आणि कारमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, चौघांचा जागीच मृत्यू झाला. इतर तीनजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या अपघातात चौघांचा मृत्यू झाला त्यात आई आणि मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोघांचाही एकाच क्षणी अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.












Click it and Unblock the Notifications