Pune New : पुणे-बंगळुरू हायवेवर भीषण अपघात! मालवाहू कंटेनर- ट्रॅव्हल्स -कारची धडक, 1 ठार 16 जखमी
Pune New Triple accident involving container travels : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथे तिहेरी अपघात घडला. यामध्ये एक जण ठार तर 16 जण जखमी झाले आहेत. आज 24 मे 2025 पहाटे हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून उपचार सुरु करण्यात आले आहे.
पुणे - बंगळूर हायवेवर शिरोली एमआयडीसी येथील मेनन पिस्टनच्या शेजारी ही घटना घडली. मालवाहतूक कंटेनर आणि ट्रॅव्हल्समध्ये हा अपघात घडला. यानंतर ट्रव्हल्सच्या मागे असलेल्या कारचीही ट्रॅव्हल्सला धडक बसली. टीव्ही-9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे, त्यानुसार, मागून आलेल्या ट्रव्हल्सची कंटेनरला जोराची धडक दिली. अपघातानंतर ट्रॅव्हल्समधील प्रवाशी घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केली.या अपघातात ट्रॅव्हल्स मधील क्लिनर रोहन कुलकर्णी (वय 30 रा. खडकलाट, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ट्रॅव्हल्समधील 16 प्रवासी जखमी
तिहेरी अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी 7 रुग्णवाहिका दाखल झाल्या, दरम्यान, जखमींना सीपीआर रुग्णालय तसेच अन्य खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातात तिन्ही वाहनाचे नुकसान झाले असून ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
हेही वाचा : Accident News : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांवर काळाचा घाला, कसा घडला थरार?
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुणे-निगडी येथून तीस ते पस्तीत प्रवाशांना घेऊन खासगी बस बेळगावच्या दिशेने जात होती. त्यावेळी शिरोली येथे पुण्याहून बंगळुरुच्या दिशेने चाललेल्या मालवाहतूक कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली. याचवेळी ट्रॅव्हल्सच्या पाठीमागे असलेल्या कारने ट्रॅव्हल्सला धडक दिली. या तिहेरी अपघातात ट्रॅव्हल्समधील क्लीनर जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्स मधील 16 प्रवासी गंभीर जखमी झाले.
महामार्गावर वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. रात्रीच्या वेळी अल्पकाळ महामार्गावर वाहनांची रांग लागली होती.
हेही वाचा : Latur Accident:लातूर-बार्शी मार्गावरील उड्डानपुलावर भीषण अपघात, रिक्षातील तिघे जागीच ठार, थरारक घटना
हेही वाचा : Ratnagiri News : मुंबई गोवा मार्गावर मोठा अपघात! रत्नागिरीत जगबुडी नदीत कार कोसळून 5 ठार
हेही वाचा : इंडियन आयडल सीजन-12चा विजेता पवनदीप राजनचा अपघात; प्रकृती गंभीर, कार कंटेनरला धडकली












Click it and Unblock the Notifications