Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इंडियन आयडल सीजन-12चा विजेता पवनदीप राजनचा अपघात; प्रकृती गंभीर, कार कंटेनरला धडकली

Pawandeep Rajan Car Accident : इंडियन आयडल-12चा विजेता गायक पवनदीप राजन एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला. उत्तराखंडहून नोएडाला जात असताना, गजरौला येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांची कार पाठिमागून धडकली. या अपघातात त्याच्यासोबत असलेला अजय मेहरा आणि चालक राहुल सिंग हे देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी तिघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Pawandeep Rajan

गायक पवनदीपची प्रकृती गंभीर

पोलिसांनी दोन्ही नुकसानग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. उत्तराखंडमधील चंपावत येथील पवनदीप हा भारतीय गायन रिअॅलिटी टीव्ही-शो इंडियन आयडल सीजन-12 चा विजेता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पवनदीप आणि त्याचा मित्र अजय मेहरासोबत कारने नोएडाला जात होता. त्यांची कारवर चालक राहुलसिंग होता.

रात्री अडीचच्या सुमारास गजरौला पोलिस स्टेशन हद्दीतील चौपाला क्रॉसिंग ओव्हरब्रिजवरून त्यांची कार खाली येताच, मागून महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली.

चालक राहुल सिंगचा डोळा लागल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात गायक पवनदीप त्याचा साथीदार अजय मेहरा आणि चालक राहुल सिंग गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर लोकांनी घेतली धाव

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथून डॉक्टरांनी तिघांनाही मुरादाबादला रेफर केले. तिघांचीही गंभीर प्रकृती पाहून पोलिसांनी त्यांना दिदौली येथील महामार्गावर असलेल्या एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले.

पवनदीपचे पाय फ्रॅक्चर तर डोक्यालाही दुखापत!

माहिती मिळताच गायक पवनदीपचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, तिघांनाही चांगल्या उपचारांसाठी नोएडा येथे नेण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पवनदीपचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत आणि त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+