"सत्तेसोबत या" शरद पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न! राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यांचा 7 जणांना संपर्क
NCP Ajit Pawar's attempt to break Sharad Pawar group MPs : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या राजकीय चर्चा सुरु आहेत.सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सात खासदारांची भेट घेत तुम्ही सत्तेसोबत या अशी ऑफर देखील सुनील तटकरे यांनी दिली आहे.
दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर नाकारल्याची माहितीही समोर आली आहे. यासंदरभात एबीपी माझाने वृत्त दिले आहे. त्यानुसार, दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करत सुनील तटकरे यांच्य बाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या (Sharad Pawar) खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठीची जबाबदारी ही सुनील तटकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्या जबाबदारीचा भाग म्हणून सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे वगळता इतर सात खासदारांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या सोबत येण्याची ऑफर दिली असे सांगितले जाते.
हेही वाचा : शरद पवारांचे फडणवीसांना पत्र: म्हणाले- हत्या प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका
तुम्ही सत्तेसोबत या...
तुम्ही सत्तेसोबत या असं सुनील तटकरे यांनी या सात खासदारांना सांगितलं. या भेटी स्वतंत्रपणे घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या भेटीबाबतची आणि ऑफर बाबतची माहिती तुम्ही कोणाला देऊ नका असेही तटकरेंनी खासदारांना म्हटलं असल्याचं बोललं जातंय. मात्र या सातही खासदारांनी या भेटीची माहिती शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळे यांना दिली त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करून याबाबतची नाराजी व्यक्त केली अशी फक्त चर्चा आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडेची यांनी तातडीने घेतली अजित पवारांची भेट; राजीनामा देणार का..? या प्रश्नावर म्हणाले...
खासदार भेटले नाही, निलेश लंकेकडून खंडन
याबाबात शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. त्यानुसार,'सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नाही. हाऊसमध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटतो बोलतो मात्र राजकीय चर्चा झाली नाही. कुठलीही ऑफर आली नाही आणि असा कुठला निर्णय होणार नाही, असे निलेश लंके म्हणाले.
हेही वाचा : शरद पवार लवकरच महायुतीत सहभागी होणार; मंत्र्याच्या दाव्याने राजकारणात वाढली चर्चा
राजकारणात कोणत्याही गोष्टीला सामोरे जायचे असते. घाबरुन निर्णय बदलायचा नसतो. सत्ता आल्यास सत्ता भोगायची अन् सत्ता नसल्यास लढायची तयारी ठेवायची असं निलेश लंके म्हणाले. कुणाचीही राजकीय भेट झाली नाही, राजकीय चर्चा झालेली नाही. अधिवेशन काळात हाय बाय नमस्कार होत असतो झाला. सुनील तटकरेंना भेटलो नसून खासदार देखील भेटले नाहीत', असं निलेश लंके म्हणाले.
हेही वाचा : अजित पवार वीस हजार मतांनी पडलेत; कसे? ती आकडेवारीच जानकरांनी सांगितली
याबाबात अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच याबाबत माहिती देतील. दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना पक्ष बदलायचा असेल तर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असेल. तुतारी गटाचे जे सात- आठ खासदार निवडून आले आहेत. त्यांना जर खरंच आमच्यासोबत यायचं असेल तर सुनील तटकरेंसोबत संपर्क केला असेल. काही खासदार आणि काही आमदार सुरुवातीपासून आमच्या संपर्कात आहेत. जर कोणी येत असतील तर स्वागत आहे असेही मिटकरी म्हणाले.












Click it and Unblock the Notifications