Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धनंजय मुंडेची यांनी तातडीने घेतली अजित पवारांची भेट; राजीनामा देणार का..? या प्रश्नावर म्हणाले...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर आता राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आज अचानक मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे सव्वा तास चर्चा झाली. त्यामुळे मुंडे राजीनामा देणार, या चर्चा सुरु झाल्या. भेटीनंतर बाहेर आलेल्या मुंडे यांना पत्रकारांनी भेटीचे कारण विचारले.

Ajit Pawar

मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी निकटवर्तीयांना अटक झाल्यानंतर अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह महायुतीतील नेत्यांनीही केली. अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदावरून काढावं, अन्यथा तपासकार्यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली. या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यासाठी बीड, परभणी आणि पुण्यामध्ये मोर्चेही काढण्यात आले.

मुंडे-अजितदादांची भेट

आज दुपारी अचानक मंत्री धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला आले. या दोघांमध्ये सुमारे सव्वा तास चर्चा झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासकार्यात दबाब येऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यभरातील नेत्यांकडून तशी मागणी केली जात आहे. या चर्चेचा तपशील बाहेर आला नसता, तरी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंडे काय म्हणाले?

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाढता दबाव लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. चर्चेनंतर सुमारे दोन तासांनी मुंडे बाहेर आहे. त्यावेळी तुम्ही राजीनामा देणार का, दादांशी कोणत्या विषयावर चर्चा झाली असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी आपण फक्त नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी दादांची भेट घेतल्याचं मुंडे यांनी सांगितलं. आपल्याला मिळालेल्या अन्न आणि पुरवठा खात्याचा अहवाल आपण यावेळी अजितदादांसमोर ठेवल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. तसेच या चर्चेमध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+