Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याचे दीड हजार आले की नाही असे तपासा
Maharashtra ladki bahin yojana january 2026 installment check status online : महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा जानेवारी २०२६ चा १५०० रुपयांचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. राज्यातील २.५० कोटींहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे हे पैसे जमा केले जात आहेत. जर तुम्हाला अद्याप मेसेज आला नसेल, तर तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता.

जानेवारी २०२६ चा हप्ता वितरीत
सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांना मागील हप्ते मिळाले नव्हते, त्यांच्या थकबाकीबाबतही शासन सकारात्मक निर्णय घेत आहे.
तुमच्या खात्यात पैसे आले की नाही? असे तपासा (Online Steps)
१. नारी शक्ती दूत अॅप (Nari Shakti Doot App)
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील 'नारी शक्ती दूत' अॅप उघडा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉगिन करा आणि OTP पडताळणी करा.
- अॅपमध्ये 'अर्जाची स्थिती' (Application Status) वर क्लिक करा. तिथे तुम्हाला हप्ता जमा झाला असल्यास 'Beneficiary Status' मध्ये माहिती दिसेल.
२. अधिकृत पोर्टलद्वारे तपासणी
- ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
- 'अर्जदार लॉगिन' वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका.
- लॉगिन झाल्यानंतर 'Status' विभागात जाऊन तुमच्या हप्त्याची माहिती मिळवा.
३. बँक बॅलन्स आणि SMS:
- तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला मेसेज तपासा.
- जर मेसेज आला नसेल, तर जवळच्या ATM मध्ये जाऊन किंवा बँकेच्या पासबुकवर एन्ट्री करून खात्री करा.
पैसे आले नसल्यास काय करावे?
जर तुमचे नाव मंजूर यादीत असूनही पैसे मिळाले नसतील, तर तुमचे बँक खाते आधार कार्डशी (Aadhar Mapping/NPCI) लिंक आहे की नाही याची खात्री करा. बँक खाते सक्रिय नसल्यास हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते. अशा वेळी त्वरित आपल्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग करून घ्यावे.
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येत नाहीत? लगेच तपासा e-KYC स्टेटस; अर्ज दुरुस्ती कशी करायची? वाचा
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचा अर्ज 'Rejected' झालाय की 'In Review' आहे? रखडलेले पैसे मिळवण्यासाठी करा 'हे' काम!
हेही वाचा : लाडकी बहिण योजनेचे पैसे अडकले तर 'हे' काम करा! योजनेतील त्रुटी सुधारण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय












Click it and Unblock the Notifications