लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येत नाहीत? लगेच तपासा e-KYC स्टेटस; अर्ज दुरुस्ती कशी करायची? वाचा
How to check ladki bahin yojana e kyc status : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊनही अनेक महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. याचे मुख्य कारण 'ई-केवायसी' (e-KYC) अपूर्ण असणे हे असू शकते. तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वी झाली आहे की नाही आणि ती कशी तपासायची, याची सविस्तर माहिती आता उपलब्ध झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय सरकारी हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही.

तुमची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झाली की नाही? 'असे' तपासा स्टेटस
जर तुम्हाला योजनेचे हप्ते मिळत नसतील, तर खालील ३ सोप्या पद्धतींनी तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता.
१. 'नारीशक्ती दूत' ॲप किंवा पोर्टलद्वारे
- सर्वात आधी 'नारीशक्ती दूत' ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा.
- 'यापूर्वी केलेले अर्ज' (Applied Applications) या पर्यायावर क्लिक करा.
- तिथे तुमच्या अर्जाच्या माहितीमध्ये हिरव्या रंगात 'e-KYC Completed' किंवा 'Verified' असे दिसत असेल, तर तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
- जर तिथे 'Pending' दिसत असेल, तर तुम्हाला प्रक्रिया पुन्हा करावी लागेल.
२. आधारच्या अधिकृत वेबसाइटवरून (UIDAI)
- ई-केवायसीचा मुख्य उद्देश तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे हा आहे.
- UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन 'Bank Seeding Status' तपासा.
- तिथे तुमचे बँक खाते आधारशी 'Active' जोडलेले दिसत असेल, तर तुमची तांत्रिक ई-केवायसी पूर्ण आहे असे समजावे.
३. थेट बँकेत जाऊन खात्री करा
जर ऑनलाईन तपासता येत नसेल, तर तुमच्या बँकेत जाऊन तुमचे खाते 'NPCI Mapping' किंवा 'DBT' (Direct Benefit Transfer) साठी लिंक आहे का, याची चौकशी करा.
अर्ज 'In Review' किंवा 'Rejected' असल्यास घाबरू नका!
तुमचा अर्ज अद्याप पडताळणीत (In Review) असेल किंवा काही कारणास्तव बाद (Rejected) झाला असेल, तर तो तुम्ही स्वतः दुरुस्त करू शकता:
अर्ज दुरुस्त करण्याची पद्धत, काय कराल?
- नारीशक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन करून तुमच्या अर्जासमोरील 'Edit' (दुरुस्त करा) बटणावर क्लिक करा.
- कारण दुरुस्त करा आणि अर्ज का नाकारला गेला आहे (उदा. अस्पष्ट फोटो किंवा चुकीचे नाव), ते वाचून नवीन कागदपत्रे अपलोड करा.
- ही माहिती अपडेट केल्यानंतर तुमचा अर्ज पुन्हा पडताळणीसाठी जाईल आणि काही दिवसात मंजूर होईल.
'हे' महत्वाचे लक्षात असू द्या
तुमचे बँक खाते 'Active' असणे आणि मोबाईल नंबर चालू असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचे मेसेज तुम्हाला वेळेवर मिळतील.
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचा अर्ज 'Rejected' झालाय की 'In Review' आहे? रखडलेले पैसे मिळवण्यासाठी करा 'हे' काम!
हेही वाचा : लाडक्या बहिणींचे जानेवारी अन् फेब्रुवारीचे प्रलंबित हप्ते 'या' तारखेला जमा होणार; 3 हजार रुपये येणार












Click it and Unblock the Notifications